Who should avoid beetroot juice: बीट, आवळा व गाजर या तिन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे त्यांचा रस प्यायल्याने व्हिटॅमिन, फायबर व अँटिऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक शरीराला मिळतात. बीटामध्ये व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी असते, जे कोलेजन वाढविण्याचे काम करते. गाजरामध्ये अँटीऑक्सिस असतात. त्याशिवाय त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर व पोटॅशियमदेखील असते. तर, आवळ्यामध्ये अनेक गुणकारी घटक असतात.
बीट, आवळा व गाजर या तिन्ही गोष्टी शरीराला बद्धकोष्ठता व आम्लपित्त या समस्यांपासून दूर ठेवतात. तसेच, केस आणि त्वचेसाठीही त्या खूप फायदेशीर आहे. पण, तुम्हाला हे माहीत आहे का की, या तिन्हींमध्ये इतके पोषक घटक असूनही काही लोकांसाठी ते पिणे घातक ठरू शकते.
बीट, आवळा व गाजराचा रस ‘या’ व्यक्तींनी पिऊ नये
गर्भवती महिला
गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय बीट, आवळा व गाजराचा रस पिऊ नये. कारण- त्यांचा आहार खूप विशेष असतो. गर्भवती महिलेसाठी या तिन्ही गोष्टींचे संयोजन योग्य आहे की नाही हे तपासणीनंतर फक्त डॉक्टरच ठरवू शकतात.
उलटी होत असल्यास
ज्या लोकांना हा रस प्यायल्यानंतर उलटी झाल्यासारखे वाटते. त्यांनी हा रस पिणे टाळावे. विशेषतः उन्हाळ्यात जर मळमळ होत असेल, तर हा रस पिऊ नये. कारण- या रसाच्या सेवनाने तुम्हाला उलटी होऊ शकते.
पोटदुखीची समस्या असणाऱ्यांनी
जर तुम्हाला उन्हाळ्यात पोटदुखीचा त्रास होत असेल, तर हा रस पिणे टाळावे. कारण- त्यात नायट्रेट असते. म्हणून हा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने पोटात दुखू शकते.