खजुरात जास्त प्रमाणात पोषणमूल्ये असल्याने आहारात याचा समावेश असावा असे म्हटले जाते. विशेषतः लहान मुले आणि महिलांनी खजूर खाल्ल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. खजुरात ‘अ’, ‘ब’, ‘क’ जीवनसत्व आणि लोह असते. खजुरामुळे आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्याने खजुराला पूर्ण अन्न म्हटले जाते. वजन कमी असलेल्या लहान मुलांना रोज २ खजूर खाण्यास द्यावे. खजुरामध्ये मोठ्या प्रमाणावर डाएटरी फायबर उपलब्ध असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच पचन देखील उत्तम राहण्यास मदत होते.

१. खजुरामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असल्याने हिमोग्लोबिनची कमतरता भरुन काढण्यास खजूर अतिशय उपयुक्त असतात. खजुरात कॅल्शियमही जास्त प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

maintaining weight will be a challenge for next four months says vinesh phogat
आता वजन राखण्याचे आव्हान – विनेश फोगट
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

२. एखादवेळी शरीरातील ताकद अचानक कमी झाल्यासारखे वाटल्यास दोन ते तीन खजूर खावेत. खजुरात ग्लुकोज असल्याने एकदम तरतरी येते.

३. खजुराच्या सेवनामुळे हृदयाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते.

४. खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.

५. खजुरात व्हिटॅमिन आणि प्रोटीन जास्त असतात. हे दोन्हीही घटक शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात. त्यामुळे बारीक असणाऱ्या व्यक्तींनी रोज ४ ते ५ खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन वाढण्यास मदत होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)