सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दिवसभरात सर्वांनी कमीत कमी पाचवेळा कोमट पाण्याचं सेवन करायला हवं. असेही करोना विषाणूविरोधात लढण्यासाठी आयुष्य मंत्रालयानंही गरम किंवा अथवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देत आहे. तसं पाहिल्यास पाणी पिण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. बदलत्या हवामानात गरम पाणी शरीरासाठी लाभदायक आहे. पचनशक्ती, रक्ताभिसरण चांगलं राहण्यास मदत होते. आपल्याला चांगलं आरोग्य राखायचं असेल तर त्यासाठी एक सोपा मंत्र आहे की, आपण दररोज सकाळी झोपून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यावं. कोरोनाशिवाय कोमट पाणी प्यायचे इतरही फायदे आहेत. ज्याबाबत आपण जाणून घेऊ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोट साफ होते –
कोमट पाणी पिण्यामुळे आतडे संकुचित होण्यास मदत होते. यामुळे आतड्यांमधे अडकलेला जुना कचरा आपल्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. अनेकदा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. रोज कोमट पाणी पिण्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of drinking hot water on an empty stomach in the morning nck
First published on: 29-08-2020 at 10:52 IST