Benefits Of Eating Ghee With Black Pepper: जो खाई तूप, त्याला येईल रूप, असं आज्या म्हणायच्या. अस्सल देशी तुपाचे शरीरासाठी होणारे फायदे आजवर अनेक तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहेत. वजन कमी करण्यापासून ते त्वचा, केस सुधारण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये या तुपाची मदत होते. तुपाचे स्वतंत्र फायदे अनेक आहेतच पण त्याच्या जोडीला काही विशिष्ट पदार्थ जोडल्यास या तुपाचे गुण आणखी वाढू शकतात. असाच एक जोडीचा पदार्थ म्हणजे काळी मिरी. विनोद अग्रवाल, आयुर्वेद तज्ज्ञ, यांनी हेल्थशॉट्सला तूप आणि काळी मिरीच्या मिश्रणाने होणाऱ्या फायद्यांविषयी माहिती दिली आहे. सुधारित जीवनशैली, नियमित व्यायाम आणि सकस आहार यांच्या जोडीने तूप आणि काळी मिरी एकत्र करून खाल्ल्याने पचन, प्रतिकारशक्ती आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते असे अग्रवाल म्हणतात. त्यांच्या मते आयुर्वेदातील या जादुई मिश्रणाचे काही फायदे व त्याच्या सेवनाची योग्य पद्धत याविषयी सविस्तर जाणून घेऊया..
तुपात काळ्या मिरीची पूड मिसळून खाण्याचे फायदे
१. सांधेदुखीपासून आराम मिळेल
तूप आणि काळी मिरी यांचे सेवन केल्याने सांधेदुखीपासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. एवढेच नाही तर याच्या सेवनाने तुमच्या रक्तातील साखरेचा स्तर सुद्धा नियंत्रित राहू शकतो. म्हणूनच, हा सर्वसमावेशक उपाय शरीरात होणारी जळजळ कमी करून हाडांना सुद्धा मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आयुर्वेदतज्ज्ञ अग्रवाल यांनी म्हटल्याप्रमाणे, “शरीरात दीर्घकाळ जळजळ झाल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, पक्षाघात, कर्करोग, मधुमेह, सांधेदुखी, मानदुखी आणि गुडघेदुखी असे त्रास होऊ शकतात.” तूप व काळीमिरी हे मिश्रण ही जळजळ कमी करायला मदत करते.
हृदय व यकृतासाठी फायदे
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, तुपात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते जे रक्ताभिसरण सुधारण्याच्या कामी येते. याव्यतिरिक्त, ते झोपेच्या चक्राचे नियमन करण्यात मदत करते. याला अनुमोदन देत अग्रवाल म्हणतात, “तूप आणि काळी मिरी यांचे सेवन हृदय आणि यकृतासाठीही फायदेशीर मानले जाते. हे रक्ताभिसरण वाढवते, झोपेचे चक्र नियंत्रित करते आणि अवयवांचे नुकसान होण्याची जोखीम कमी करते.”
समरणशक्ती व मेंदूच्या कार्यात मदत
अग्रवाल सांगतात की, तूप आणि काळी मिरी यांचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तूप आणि काळी मिरी यांचे सेवन केल्याने मेंदू तीक्ष्ण होऊन निरोगी राहतो. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी व काम करण्यात सुसूत्रता आणण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते.
प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत
काळी मिरी आणि तुपाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
दृष्टी सुधारणे
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, तुपाचे नियमित सेवन डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी प्रभावी ठरू शकते. तूप हे व्हिटॅमिन ए चा एक चांगला स्रोत आहे ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते.
एंजियोजेनेसिसला प्रोत्साहन द्या
ही एक प्रक्रिया आहे जी शरीराला नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यास सक्षम करते. जर एंजियोजेनेसिस शरीरात अगदी बरोबर कार्य करत असेल, तर ते हृदयाला नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यास सक्षम करून रक्ताभिसरण सुधारते. जळजळ, खराब झोपेचे चक्र आणि औषधांचे सेवन एंजियोजेनेसिसमध्ये व्यत्यय आणू शकते आणि अवयवांचे नुकसान होऊ शकते. काळी मिरी आणि तूप मिळून शरीरातील एंजियोजेनेसिस प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम करू शकते.
हे ही वाचा << महिलांनी आठवड्यातून केवळ ‘इतकी’ मिनिटे व्यायाम केल्यास मृत्यूचा धोका होतो २४ टक्के कमी; तर पुरुषांना..
तुमचे शरीर डिटॉक्सि करण्यासाठी
आपल्या शरीरातील प्रत्येक गोष्ट आपल्या आतड्यात सुरू संपते. खराब आतडे म्हणजे खराब आरोग्य, त्वचा, पचन, मानसिक आरोग्य, चिंता इ. तूप आणि काळी मिरी यांचे मिश्रण शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून आतडे सुदृढ करण्यास मदत करू शकते.
तूप आणि काळी मिरी यांचे सेवन कसे करावे?
एक चमचा देशी तूप व 1/2 टीस्पून काळी मिरी मिसळा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.