बेनेली इंडियाने भारतात आपली नवी बाइक Leoncino 250 लाँच केली आहे. 2.5 लाख रुपये इतकी या बाइकची एक्स-शोरुम किंमत आहे. इटलीच्या बेनेली कंपनीची ही भारतातील सर्वात स्वस्त बाइक आहे. 6,000 रुपयांमध्ये बेनेलीच्या अधिकृत संकेतस्थळ आणि डीलरशीप्समध्ये बाइकसाठी बुकिंग स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Benelli Leoncino 250 बाइक व्हाइट, ग्रे, रेड आणि ब्राउन अशा चार कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यावर 3 वर्षांची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी आहे. भारतीय बाजारात या बाइकची स्पर्धा केटीएम ड्यूक 250, महिंद्रा मोजो 300, केटीएम ड्यूक 390 आणि BMW G3 10R यांच्याशी असेल. बेनेलीच्या या बाइकमध्ये 249CC क्षमतेचं सिंगल-सिलिंडर लिक्विड कूल्ड मोटर इंजिन आहे. हे इंजिन 25.8 hp ची ऊर्जा आणि 21.2 Nm टॉर्क निर्माण करतं. बाइकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स देखील आहे.

आणखी वाचा- Tata Harrier वर 65 हजार रुपयांची सवलत, काय आहे ऑफर ?

12.5 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी असलेल्या या बाइकमध्ये फुल्ली डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल आणि लायटिंगसाठी ऑल-LED सेटअप आहे. उत्तम रोड हँडलिंगसाठी ड्युअल चॅनल ABS असून 280 mm सिंगल डिस्क फ्रंट ब्रेक आहे. तर, mm सिंगल डिस्क रिअर ब्रेक आहे. ब्लॅक्ड-आउट अॅलॉय व्हिल्स असलेल्या या बाइकला ‘नेक्ड स्ट्रीट लूक’ देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benelli leoncino 250 launched at rs 2 5 lakh making it the most affordable benelli sold in the country sas
First published on: 07-10-2019 at 09:34 IST