Flipkart Smart Upgrade Plan : सण उत्सवामध्ये किंवा त्याआधी मोठ्या डिस्काऊंटमध्ये नवनवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. अशामध्येच Flipkart चा बहुप्रतिक्षीत ‘बिग बिलियन डेज सेल’ १६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सहा दिवस हा सेल चालणार असून २१ ऑक्टबरला शेवटचा दिवस असेल. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर आणि शानदार डिल्स मिळतील.

पुढील शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या Flipkart Big Billion Day Sale मध्ये एक शानदार ऑफर मिळणार आहे. Flipkart Sale च्या दरम्यान मिळणाऱ्या या ऑफर्सचं नाव Smart Upgrade आहे. यासाठी फ्लिपकार्ट आणि सॅमसंगने हातमिळवणी केली आहे. Smart Upgrade च्या या सेलमध्ये काय आहे ऑफर आणि तुम्हाला काय मिळेल फायदा… याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

काय आहे Flipkart Smart Upgrade?
फ्लिपकार्ट सेलदरम्यान ग्राहकांना फक्त ७० टक्के किंमत देऊन सॅमसंग मोबाइल खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरचा फायदा किंवा लाभ घेण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड EMI स्कीम अंतर्गत सॅमसंगचा मोबईल खेरेदी करावा लागेल.

तुम्ही फक्त Smart Upgrade या ऑफरसाठी लिस्ट केलेले स्मार्टफोन्स ७० टक्केंच्या किंमतीत खरेदी करु शकतात.

Smart Upgrade या ऑफरची खास बाब म्हणजे, १२ महिने स्मार्टफोन वापरुन राहिलेले ३० टक्के रक्कम देऊन फ्लिपकार्टवर उपलबद्ध असणाऱ्या दुसऱ्या स्मार्टफोन्समध्ये अपग्रेड करु शकता.

Smart Upgrade या ऑफरचा असा घ्या फायदा-
प्रोडक्ट पेजवर फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्लानला अॅड करा. त्यानंतर फोन करेदी करताना पेमेंट ऑप्शनमध्ये क्रेडिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायाची निवड करा. यानंतर तुम्हाला पेमेंट पेज दिसेल. आणि ३० टक्के फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड ऑफर अंमलात आलेली असेल.

Smart Upgrade या ऑफरअंतर्गात कोण कोणते स्मार्टफोन्स विक्रीसाठी उपलबद्ध असल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याशिवाय या सेलदरम्यान ग्राहकांना विविध प्रॉडक्टसवर शानदार डिल्स मिळणार आहे.