महिंद्रा कंपनी लवकरच आपली शानदार XUV300 भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या या गाडीसाठी आजपासून अधिकृतपणे बुकिंग सुरू करण्यात आली आहे. महिंद्राच्या काही डिलर्सनी डिसेंबर महिन्यापासूनच अनधिकृतपणे या गाडीसाठी बुकिंग घ्यायला सुरूवात केली होती, पण आता देशभरातील महिंद्राच्या सर्व डिलर्सकडे बुकिंग सुरू झाली आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारी महिन्यात ही गाडी भारतीय बाजारात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या गाडीची किंमत किती असेल याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही मात्र, सध्या बाजारात असलेल्या 8 ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या एसयुव्हींना या गाडीद्वारे जोरदार टक्कर मिळेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. म्हणजेच या गाडीची किंमत 8 ते 12 लाख रुपयांपर्यंत असू शकते. त्यामुळे बाजारात असलेल्या ह्युंडाईच्या क्रेटा, रेनॉल्ट डस्टर आणि Captur यांसारख्या एसयुव्हींना आव्हान निर्माण होऊ शकतं. तीन व्हेरिअंट्समध्ये ही कार उपलब्ध असेल. इटलीत या गाडीची चाचणी घेण्यात आल्याचं समजतंय.

यामध्ये कंपनीने 7 एअरबॅग्स, सनरूफ, LED प्रोजेक्टर हेडलँप्ससह LED टेललँप्स, 17-इंच अॅलॉय व्हील्स यांसारखे अनेक फिचर्स दिले आहेत. डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही प्रकारात ही एसयुव्ही उपलब्ध असणार आहे. 1.2 लीटर G80 टर्बो पेट्रोल आणि1.5 लीटर डिझेल इंजिन यामध्ये आहे. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. लाँचिंगच्या वेळी कंपनी ही गाडी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध करणार नाही.

गाडीचा पुढील भाग हेडलँप्स, फॉग लँप्स, डेटाइम रनिंग लाइट्स आणि ग्रिलवरील क्रोम स्टेलमुळे आकर्षक दिसत आहे. या SUV चा टेलगेट देखील आकर्षक असून रूफ माउंटेड स्पॉइलरसह दमदार बंपर, मोठी सिल्वर स्किड प्लेटमुळे हीचं रुप आणखी उठून दिसतं. कारमध्ये लेदर इंटीरिअर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 7 एयरबॅग्स, रिवर्स पार्किंग कॅमेरा, पावर सॉकेट, USB , ऑक्स-इन पोर्ट आणि सेंसर्स यांसारखे अनेक दमदार आणि हायटेक फिचर्स देण्यात आलेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bookings open for mahindra xuv300
First published on: 09-01-2019 at 19:29 IST