Bajaj Auto ने आपल्या बजाज सीटी आणि प्लॅटिना या दोन बाइक्स नव्या बीएस-6 मानकांनुसार भारतीय बाजारात आणल्या आहेत. बजाज सीटी ही बाइक Bajaj CT100 आणि CT110 अशा दोन पर्यायांसह लाँच करण्यात आली आहे. 40 हजार 794 रुपये इतकी बाइकची एक्स-शोरुम किंमत आहे. तर, बजाज प्लॅटिनाही 100cc आणि 110cc H-Gear अशा दोन व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. या दोन्ही व्हेरिअंट्सची एक्स-शोरुम किंमत अनुक्रमे 47 हजार 264 रुपये आणि 54 हजार 797 रुपये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही दुचाकी बीएस-6 उत्सर्जन मानकांची पूर्तता करणाऱ्या इंजिन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आल्यात. दोन्ही दुचाकींमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन सिस्टिम आहे. यामुळे जास्त मायलेज मिळण्यास मदत होते असं कंपनीने म्हटलंय. दोन्ही दुचाकींच्या लूक आणि डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जुन्या बीएस-4 इंजिनच्या तुलनेत नवीन इंजिनचे मॉडेल जवळपास 7 हजार रुपयांनी महाग आहे.

आणखी वाचा – जास्त मायलेजसह Heroची नवीन Pleasure Plus, होंडाच्या Activa सोबत स्पर्धा

या दोन्ही दुचाकीनंतर कंपनी पुढच्या काही आठवड्यात इतर दुचाकीही बीएस6 व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bs6 bajaj ct 100 bajaj platina launched in india know price and all other details sas
First published on: 07-02-2020 at 15:48 IST