How to stop burn pain immediately: घाईगडबडीत स्वयंपाक करताना बऱ्याचदा गरम तेल, वाफ किंवा कोणत्याही गरम भांड्याला चुकून हात लागल्यामुळे आपल्या हाताला भाजल्याने इजा होते. अशा परिस्थितीत भाजल्यावर लगेच काय करावे, त्यावर कोणते औषध लावावे हे आपल्याला कळत नाही. अशा वेळी तुम्ही भाजल्यावर काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

भाजल्यास सर्वांत आधी काय करावे?

डॉक्टरांनी सांगितले की, जर तुमचा हात किंवा शरीराचा कोणताही भाग भाजला असेल, तर तो भाग प्रथम थंड पाण्याने स्वच्छ करा. जर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त भाजले असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कमी प्रमाणात भाजले असेल, तर तुम्ही टूथपेस्टदेखील लावू शकता.

हे देशी उपाय करतील मदत

भाजल्यानंतर त्या भागावर जर जळजळ होत असेल, तर जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही प्रभावित भागावर कोरफडीचा गर लावू शकता. त्यामुळे तेथे फोड येण्याला रोखणे शक्य होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजल्यानंतर तुम्ही हातावर मधदेखील लावू शकता. त्यामुळे जखम होत नाही. काही वेळ मध हातावर तसाच ठेवल्यानंतर हात पाण्याने धुऊन घ्या.

भाजल्यानंतर फोड येऊ नयेत म्हणून तुम्ही केळ्याचा गर, नारळाचे तेल किंवा बटाट्याचा रस लावू शकता. त्यामुळे सूज कमी होण्यासदेखील मदत होते.