सध्या फोटोंचा जमाना आहे. नोकरीसाठीही आता कंपन्यांकडून मुलाखतीआधी किंवा नंतर उमेदवारांच्या सोेशल प्रोफाईल्स पाहून त्यांचा अंदाज घेतला जातो. त्यावेळी आपला फोटो आणि आपली प्रोफाईल हे आपलं सुरूवातीचं इंप्रेशन ठरू शकतं. त्यामुळे आपल्या सोशल प्रोफाईल्स अपडेटेड आणि चांगल्या स्थितीत ठेवणं हे आता आधीपेक्षा जास्त महत्चाचं झालं आहे.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ठरतो तो आपला फोटो. आपण आपल्या प्रोफाईलमध्ये काय तारे तोडलेत हे पाहण्याआधीही साहजिकच फोटोकडे लक्ष जातं. आता जवळजवळ सगळेजण आपला  फोटो किमान चांगला असेल याची काळजी घेतोच पण सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर काही टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

आता यातच एका नव्या टिपची भर पडली आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या सायकोलाॅजी डिपार्टमेंटने केलेल्या अभ्यासानुसार ज्या फोटोमध्ये आपण ‘फ्रेमच्या उजव्या बाजूला पाहत असतो’ अशा फोटोची छाप जास्त पडते. आता याचा अर्थ काय? पुढचे फोटोज् पहा.

salman-featured-processed
सौजन्य: गूगल

 

सौजन्य- गूगल
सौजन्य- गूगल

या प्रकारच्या फोटोज् ची छाप पडते असं केेंब्रिज युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात आढळून आलं आहे. हा काही दगडात कोरलेला नियम नाही. पण आपल्या या अभ्यासादरम्यान युनिव्हर्सिटीने अनेक मुद्द्यांचा विचार केला. आणि त्यावरून कुठल्या प्रकारच्या फोटोला पसंती मिळण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे याचा विचार केल्यावर त्यांना हे आढळून आलं आहे.

याचं इथल्या तज्ज्ञ अभ्यासकांना मिळालेलं कारणसुध्दा इंटरेस्टिंग आहे. इंग्लिश (आणि भारतीय भाषाही) कागदावर लिहिली जात असताना डावीकडून  उजवीकडे लिहिली जाते. त्यामुळे ही भाषा वाचण्याची सवय असणाऱ्या सर्वांना एखाद्या कागदाच्या किंवा फोटोच्या डाव्या बाजूला पहिल्यांदा पाहण्याची सवय असते. त्यामुळे जर आपला फोटो ‘राईट प्रोफाईल’ असेल तर पाहणाऱ्याच्या तो चटकन लक्षात येतो आणि नजरेत भरतो असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे.

यापुढची मजा म्हणजे हा नियम जर खरा मानला तर उर्दू आणि अरेबिक भाषिकांच्या बाबतीत हाच प्रकार उलटा असण्याची शक्यता आहे कारण या भाषा उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. मग या प्रदेशातल्या सोशल नेटवर्क्समध्ये ‘लेफ्ट प्रोफाईल’ फोटोज् जास्त ‘नोटीस’  होतील का? मजेदार विचार आहे.

हे सगळं असलं असलं तरी चार दिवस आंघोळ न करता ‘विचारात पडलेलो असल्याचा’, ‘भावपूर्ण’ वगैरे फोटो काढायला गेलात तर कंपन्या राहिल्या दूर पण व्हॅलेंटाईन्सला पण कुणी भाव देणार नाही. त्यामुळे जरा नीटपणे विचार करून प्रोफाईल पिक ठेवा!