प्रेम ही एक अत्यंत सुंदर भावना आहे. तुमच्यावर एखादी व्यक्ती प्रेम करते किंवा आपल्याला विश्वासाने मनातील सर्व गोष्टी व्यक्त करण्यासाठी एखादा जोडीदार मिळाल्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. मात्र, जसे प्रेमात पडल्याचे फायदे असतात तसेच त्याचे काही तोटेदेखील असतात. लहान-मोठी भांडणं तर सगळ्यांमध्येच होतात. मात्र, त्यापलीकडेही काही न दिसणारे किंवा हळूहळू जाणवणारे तोटे असतात. ते म्हणजे प्रेमात पडल्यावर वजन वाढणे किंवा लठ्ठपणा येणे. आता प्रेमाचा आणि वजन वाढण्याचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याबद्दल आपण माहिती पाहू.

प्रेमात पडल्यावर व्यक्तीचे वजन वाढू शकते का?

२०१२ साली प्रकाशित झालेल्या, ‘ओबेसिटी’ [Obesity] नावाच्या एका जर्नलमध्ये यासंदर्भात झालेल्या एका अभ्यासाबद्दल माहिती दिली होती. त्यानुसार, या अभ्यासात साधारण आठ हजार लोकांच्या वजनाचे निरीक्षण करण्यात आले होते. यात विवाहित, एकत्र राहणारे आणि एकमेकांना डेट करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता. त्यामध्ये संशोधकांना असे आढळून आले की, लग्नाच्या सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये स्त्रियांचे साधारण ११ किलो वजन वाढते. ज्या स्त्रिया जोडीदाराबरोबर एकत्र रहात आहेत पण त्यांचे लग्न झालेले नाही, त्यांचे वजन साधारण आठ किलोंनी वाढते. तर सर्वांत शेवटी ज्या स्त्रिया डेट करत आहेत किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत, परंतु जोडीदाराबरोबर रहात नाहीत, त्यांचे वजन अंदाजे सात किलोंनी वाढते. असे अभ्यासात म्हटले असल्याची माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजते.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

हेही वाचा : Couple yoga poses : नाते आणि आरोग्य दोन्ही राहील उत्तम! तंदुरुस्त रहाण्यासाठी हे ४ प्रकार पाहा

परंतु, रिलेशनशिपमध्ये किंवा लग्न झाल्यानंतर वजन वाढण्याचे नेमके कारण काय बरं असू शकते? याचे उत्तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये दडलेले असू शकते. तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे वजन वाढण्याची, लठ्ठपणा येण्याची ही तीन कारणं असू शकतात.

प्रेमात पडल्यावर वजन वाढण्याची कारणे

१. जोडीदाराच्या सवयीचा तुमच्यावर पडणारा प्रभाव

दोघांपैकी एकाला जरी अरबटचरबट, फास्ट फूड किंवा बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय असेल, तर ती सवय दुसऱ्या व्यक्तीला लागण्याची शक्यता असते. अशाने तुम्ही किंवा तुमचा जोडीदार लठ्ठ होण्याची शक्यता ही अंदाजे ३७% असल्याचे, ‘द न्यू इंग्लंड ऑफ जर्नल ऑफ मेडिसिन’च्या अभ्यासात म्हटलं आहे.

हेही वाचा : foxtail millet : मधुमेह ते कोलेस्ट्रॉल सर्वांवर गुणकारी ‘बाजरी’! पाहा डॉक्टरांनी सांगितलेले फायदे…

२. बाहेरचे पदार्थ खाण्याचे प्रमाण

खाण्याची हौस म्हणून किंवा सुट्टीच्या दिवशी नवनवीन हॉटेल्स किंवा कॅफेमध्ये जाऊन खाणे किंवा स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला म्हणून बाहेर जेवणे असे जर तुम्ही करत असाल, तर त्यामुळेही वजन वाढण्याची शक्यता असते. कारण बाहेरच्या पदार्थांमध्ये चीज, बटर, तेल वैगैरे घटक भरपूर असतात. त्यावेळेस खाण्यासाठी ते पदार्थ सुंदर लागतात, मात्र कालांतराने त्याचा परिणाम वजनावर दिसून येतो.

३. मद्यपान करणे

अनेक पुरुष किंवा स्त्रिया मद्यपान करतात. खासकरून जेव्हा तुम्ही जोडीदाराबरोबर ‘डिनर डेट’साठी बाहेर जाता, तेव्हा अनेक जण मद्याचे सेवन करतात. मात्र, ते अतिप्रमाणात केल्यानेदेखील वजन वाढण्याची शक्यता असते.

हेही वाचा : तुम्ही ‘Unhealthy relationship’ मध्ये आहेत का? हे ओळखण्यासाठी ‘या’ चार टिप्स लक्षात ठेवा…

वजन नियंत्रित ठेवण्याचे उपाय

१. पौष्टिक आहार घ्यावा.

जोडीदाराबरोबरच स्वतःचे आरोग्य जपा. विनाकारण फास्ट फूड खाण्यापेक्षा आहारात भाज्या, डाळी यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

२. जोडीदाराबरोबर स्वयंपाक बनवा

आपल्या जोडीदाराबरोबर मिळून स्वयंपाकघरात एकमेकांच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा.

३. बाहेर जेवताना कमी प्रमाणात अन्न मागवा

बाहेर जेवणाचा बेत झाल्यास पदार्थ कमी प्रमाणात मागवा. एक पदार्थ दोघांमध्ये मिळून-मिसळून खाण्याचा प्रयोग करून पाहा, अशी माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून मिळते.

[टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]