Benefits of foxtail millets : आहारात सेवन केले जाणारे विविध प्रकारचे धान्य हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, आपला आहार प्रथिनयुक्त असावा असे जर तुम्हाला वाटत असले तर त्यासाठी एक अत्यंत सोपा उपाय किंवा सहज उपलब्ध होणारे एक धान्य आहे. ते धान्य म्हणजे बाजरी. “सर्वांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी विविध धान्य उपलब्ध आहेत. यामध्ये एक असा धान्यप्रकार आहे, जो स्नायूंच्या बळकटीसाठी, टिशूंची [उतींची] देखभाल करण्यास किंवा वजन कमी करायचे असल्यास प्रचंड फायदेशीर आहे. ते धान्य म्हणजे बाजरी”, असे पोषणतज्ज्ञ [न्यूट्रिशनिस्ट] जुही कपूर यांचे म्हणणे असल्याचे, ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एका लेखावरून समजते.

APEDA चा १०० ग्रॅम धान्याचा हवाला देत जुही यांनी इतर कोणकोणत्या धान्यात किती प्रथिने असतात याबद्दल सांगितले आहे. त्यानुसार बाजरीमध्ये १२.३ ग्रॅम प्रथिने असतात, तर लहान बाजरीमध्ये १०.१ ग्रॅम प्रथिने उपलब्ध असतात. त्याबरोबरच ज्वारीमध्ये ९.९ ग्रॅम, वरीमध्ये ८.३ ग्रॅम, कोद्रामध्ये [kodro millet] ८ ग्रॅम, नाचणीमध्ये ७.१ आणि बार्नयार्ड [बार्टी] या धान्यामध्ये ६.२ ग्रॅम इतक्या प्रथिनांचा समावेश असतो.

How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
How Alphanso Mango Can Help Loose Weight Control Blood Sugar
आंबा खाल्ल्याने मधुमेहापासून वजन कमी करण्यापर्यंत होऊ शकतो फायदा; पण ‘ही’ खाण्याची पद्धत व रेसिपी नीट बघा

हेही वाचा : हृदयाच्या आरोग्यापासून ते उत्तम झोपेपर्यंत ‘Cuddling’, ‘मिठी मारणे’ ठरते फायदेशीर! काय सांगतात डॉक्टर पाहा…

“बाजरी/धान्य हे कायम डाळीबरोबर खावे. यामुळे आपल्या शरीराला अधिक आणि उत्तम प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होतो”, असा विशेष सल्ला पोषणतज्ज्ञ जुहीने दिलेला आहे.

आपल्या शरीरातील उतींची काळजी घेणे, त्यांची देखभाल करण्यासाठी प्रथिने मदत करत असतात. “आपल्या आहारात प्रथिनांचा समावेश करण्यासाठी आपण कायमच अंडी, मांस, दूध, बीन्स यांचा वापर करतो; परंतु प्रथिनांचा सर्वोत्तम पर्याय असणाऱ्या धान्यांना मात्र आपण अगदी सहज विसरून जातो”, असे आहारतज्ज्ञ सिमरत भुई [dietitian Simrat Bhui] यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले आहे.

सर्वप्रकारच्या धान्यांमध्ये किमान ८ ते २० टक्के प्रथिने आणि मुबलक प्रमाणात कर्बोदके, फॅटी ॲसिड उपलब्ध असतात. “एका अभ्यासानुसार, बाजरी या धान्यामध्ये साधारण १२.३ टक्के इतके प्रथिनयुक्त घटक उपलब्ध असतात. याचा अर्थ प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असणारा पदार्थ हा बाजरी आहे”, असे भुई म्हणतात.

तरीही तुम्हाला बाजरी का खावी किंवा बाजरी खाल्ल्याने आपल्याला शरीराला, आरोग्याला नेमके कोणते फायदे होतात याची माहिती हवी असल्यास हे पाहा.

हेही वाचा : तीन महिने ‘सोडा’ टाळल्याने शरीरात कोणते फरक दिसतील? प्रसिद्ध रॅपरचा २५ किलो वजन कमी करताना फक्त..

बाजरी का खावी? बाजरी खाण्याचे फायदे काय? [Why we should eat foxtail millet]

मधुमेह, कोलेस्ट्रॉल, पित्त, पोटात जळजळ होणे, बद्धकोष्ठता आणि ॲनिमिया यांसारख्या सर्व प्रकारच्या त्रासांवर बाजरी हा एक सर्वात उत्तम आणि सोपा असा उपाय आहे. आहारात बाजरीचे सेवन केल्याने, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्याचा फायदा होतो. ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी करायचे आहे, कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, अशांसाठी बाजरी खूपच उपयुक्त ठरते. कारण बाजरीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

इतकेच नाही तर आपल्या शरीरात लोह, कॅल्शियम, मँगनीज, फायबर इत्यादी घटकांचा पुरवठा बाजरीच्या सेवनामधून होत असतो. तसेच बाजरीमध्ये फायबर असल्याने हे धान्य खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. पोटामध्ये जळजळ, आग होत असल्यास, पित्ताचा त्रास होत असल्यास बाजरी हे एखाद्या औषधीप्रमाणे काम करते.

बाजारामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे हे धान्य लहान मुलांसाठी तसेच गरोदर स्त्रियांसाठीदेखील अत्यंत उपयुक्त आहे. शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमियाचा त्रास असल्यास, शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्याचेही काम बाजरी करत असते.

“आपल्या आहाराची, त्यामधील प्रथिनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणतेही धान्य, बाजरी हे कायम डाळीबरोबर खावे. असे केल्याने शारीरिक प्रक्रियांसाठी, स्नायूंच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारे अमिनो ॲसिड आपल्याला या परिपूर्ण आहारातून मिळण्यास मदत होते”, असे जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या पीएस, मुख्य आहारतज्ज्ञ, सुषमा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला’ माहिती देताना म्हटले आहे.

पोषणतज्ज्ञ जुही कपूरने सोशल मीडियावर धान्य आणि त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते याबद्दल माहिती देणारा हा फोटो शेअर केला आहे.