Reuse Of Tea Leaves After Making Chai: टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे ही भारतीयांची ओळख आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अगदी घरात आलेली प्रत्येक वस्तू तिचा पूर्ण वापर केल्याशिवाय फेकून द्यायची नाही ही सवय आपल्यापैकी सुद्धा अनेकांना असेल. आणि लक्षात घ्या काही मोजक्या लोकांनी तुम्हाला नावं वगैरे ठेवली तरी पर्यावरणाचा व आर्थिक बाजूचा विचार केल्यास ही सवय अत्यंत योग्य आहे. फक्त मध्यमवर्गीय किंवा सामान्य माणसंच नव्हे तर अनेक सेलिब्रिटीज सुद्धा अशाप्रकारे टाकाऊ ते टिकाऊ वस्तू बनवताना वेळोवेळी दिसतात. अलीकडेच शेफ संजीव कपूर यांनी अलीकडेच चहाच्या पानांचा वनस्पती खत म्हणून पुनर्वापर करण्याचा एक हॅक शेअर केला होता. भारतीय घरांमध्ये दिवसातून समजा तीन वेळा जरी चहा बनत असेल तर अशी किती चहा पावडर रोज फेकून वाया जात असेल विचार करा. मात्र आज आपण अशा काही ट्रिक बघणार आहोत ज्या वापरून आपण फेकून देण्याऐवजी या चहाच्या पावडरचा वापर करू शकणार आहात. चला तर मग…

प्राची जैन, सीके बिर्ला हॉस्पिटल, गुरुग्राम येथील मुख्य क्लिनिकल पोषणतज्ज्ञ यांनी इंडियन एक्सस्प्रेसच्या लेखात वापरलेल्या चहाच्या पानांच्या पुनर्वापराच्या काही कल्पना शेअर केल्या आहेत.

How Much Rice & Roti You Should Eat In a Day
एका वेळच्या जेवणात भात व पोळ्यांचे आदर्श प्रमाण किती हवे? ताटात कुठल्या गोष्टी किती टक्के हव्यात? तज्ज्ञांनी दिलं सूत्र
what happens if you give up dal for a month
महिनाभर डाळीचे सेवन न केल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात?
creditors haircuts in bankruptcy cases jump to 73 percent in fy 24
दिवाळखोरी प्रकरणांत बँकांच्या कर्जरकमेला कात्री ७३ टक्क्यांपर्यंत!
10th Board Exam Topper Heer Ghetiya Dies
१० वीला ९९.७० टक्के मिळवणाऱ्या हीरचा निकालानंतर चार दिवसातच मृत्यू; वडिलांचा निर्णय वाचून मन हळहळेल
budh gochar mercury transit in mesh these 3 zodiac sign get more profit astrology
येत्या २४ तासांनंतर हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; बुधाच्या मेष राशीतील प्रवेशाने संपणार वाईट काळ
mht cet exam dates marathi news, mht cet latest marathi news
सीईटीच्या तारखा पुन्हा बदलल्या, आठ परीक्षा पुढे ढकलल्या
malaysia development berhad scandal
‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग २)
What is Sleep Divorce
Sleep Divorce म्हणजे काय? जोडप्यांनी रात्री वेगळं झोपणं कितपत फायदेशीर?

*झाडांसाठी खत: चहाची पाने ही कुंड्यांमध्ये नुसतीच जरी टाकली तरी उत्तम खत म्हणून काम करतात. यामुळे रोपांना नायट्रोजन प्राप्त होते, अधिक उत्तम परिणामासाठी आपण चहा पावडर व रोपांची सुकलेली पाने एकत्र करून सुद्धा रोपांना खत म्हणून टाकू शकता.

*दुर्गंधीसाठी : वाळलेली चहाची पाने रेफ्रिजरेटर, शूज किंवा कपाट यांसारख्या ठिकाणी ठेवावी. साधारण ज्या ठिकाणी अनेक वस्तू असल्यामुळे कुबट वास येण्याची शक्यता असते तिथे ही वापरलेली पावडर साध्या फडक्यात बांधून ठेवावी जी हा सगळं दुर्गंध शोषून घेऊ शकते.

*स्वच्छतेसाठी: नॉनस्टिक पॅन किंवा कढईवर शक्यतो स्क्रब वापरू नये असं म्हणतात अशावेळी आपण स्क्रब म्हणून काथ्याऐवजी चहा पावडर वापरू शकता. चहामधील टॅनिन डाग आणि चिकट थर काढून टाकण्यास मदत करू शकते.

*फेशियल एक्सफोलिएटर: बारीक चिरलेली, वाळलेली चहाची पाने तुमच्या त्वचेसाठी नैसर्गिक एक्सफोलिएटिंग स्क्रब म्हणून उत्तम काम करू शकतात. DIY फेस मास्कसाठी चहा पावडर किंवा पाने मध किंवा दही मिसळून चेहऱ्याला लावावी.

*केस धुण्यासाठी: चहा पावडर भिजवलेले पाणी म्हणजे कोरा चहा थंड करून त्याने केस धुतल्याने केसाचा रंग गडद होण्यासाठी तसेच केसाची भरभर वाढ होण्यासाठी सुद्धा फायदा होऊ शकतो.

*कीटकांना दूर ठेवण्यासाठी: कीटकांपासून बचाव करण्यासाठी तुमच्या बागेत किंवा घरात वाळलेल्या चहाची पावडर बांधून ठेवू शकता. या गंधामुळे कीटक दूर राहतात.

*स्वयंपाकासाठी चव वाढवणारे: चहाच्या प्रकारानुसार, वापरलेली चहाची पाने रेसिपीची चव वाढवू शकतात. या पानांचा वापर मांस मॅरीनेट करण्यासाठी केला जाऊ शकतो. तर छोले किंवा कडधान्य शिजवताना आपण एका कपड्यात बांधून चहा पावडरची पोटली कुकरमध्ये घालू शकता ज्याने कडधान्याला छान चव येऊ शकते.

*होममेड पॉटपॉरी: वाळलेल्या चहाच्या पानांना इतर सुगंधी औषधी वनस्पती आणि वस्तूंसह मिसळून घरच्याघरी पॉटपरी बनवू शकता.

हे ही वाचा << सुकून कुजू लागलेली तुळस डेरेदार करतील ‘हे’ दोन मसाले; बुरशी लागू नये म्हणून पाण्याचा हा नियम बघा

पोषणतज्ज्ञ जैन सल्ला देतात चहाची पावडर साठवण्याबाबत येणारी एक मोठी समस्या म्हणजे त्यात ओलसरपणा असतो. म्हणून शक्य असेल तेव्हा सकाळी चहा केल्यावर दिवसभर ती पावडर गाळून सुकवून घ्यावी आणि मग कोरडी झाल्यावर तिचा वापर करता येईल. वापरताना वाटल्यास आपण त्यात थोडे पाणी शिंपडू शकता. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा.