डॉ. अश्विन सावंत
Health Special उन्हाळ्यामध्ये ज्या तक्रारींनी रुग्ण बेजार होतात, त्यातली एक महत्त्वाची तक्रार म्हणजे मलावरोध किंवा शौचाला साफ न होणे. काही रुग्णांना मलावरोधाचा एवढा त्रास होतो की कुंथल्याशिवाय त्यांना शौचास होतच नाही किंवा कडक मलप्रवृत्ती हो‌ऊन मलविसर्जनाचे वेळी वेदना होतात. या दोन्हीं कारणांमुळे अनेकांना पाईल्स, फिशर्स अशागुदविकारांचा त्रास सुद्धा होतो.

उपचारासाठी येणार्‍या अनेक लहान मुलांनासुद्धा या उन्हाळ्यात तीन-तीन,चार-चार दिवसांनी शौचास होते व जेव्हा होते तेव्हा खड्याच्या स्वरुपात होते. वास्तवात मलावरोधाचा त्रास हिवाळ्यात अधिक होतो. (वातावरणामध्ये व शरीरामध्ये वाढलेला कोरडेपणा, आहारामध्ये तेलतुपाची कमी, चलनवलनाचा अभाव व कमी जलप्राशन ही त्यामागची कारणे), मात्र उन्हाळ्यात तर वातावरण कोरडे नसते, उलट दमट व उष्ण असते आणि आपण पाणीसुद्धा भरपूर प्रमाणात पितो, अगदी वारंवार, ते इतके की पाण्यानेच पोट टम्म् फुगते! मग तरीही उन्हाळ्यामध्ये मलावरोधाचा त्रास का व्हावा?

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Is thirst a good predictor of dehydration
तहान लागते म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Why extreme heat can trigger headaches
अतिउष्णतेमुळे डोकेदुखी का होते? तज्ज्ञांनी सांगितले कारण अन् उपाय
Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
Coconuts Are Not Allowed On Planes
Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत

आणखी वाचा-Health Special: कृत्रिम प्रोटीन शरीर नाकारतं, असं का होतं?

मलावरोध का होतो?

मलावरोध होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मलाला मृदुता (नरमपणा) येत नाही. पण भरपूर पाणी पि‌ऊनही मल मृदू (नरम) न होता कठीण का होतो? याचाच अर्थ प्राशन केलेले पाणी मलापर्यंत पोहोचत नाही. मग आपण पितो ते पाणी जाते कुठे? ते जाते उष्म्याच्या काहिलीने शरीरामधून कमी झालेल्या पाण्याची भरपा‌ई करण्यामध्ये. इतर ऋतूंच्या तुलनेमध्ये उन्हाळ्यामध्ये शरीराची पाण्याची गरज दुपटीने वाढते, त्यात अंगाची काहिली होत असते त्या उष्म्यामध्ये तर अधिकच. साहजिकच शरीराची पाण्याची कमी भरुन काढण्याला शरीर अधिक महत्त्व देते.

अंगातला उष्मा कमी व्हावा म्हणून लोक थंड पेयं पित असतात, जसे की सरबत, नारळ पाणी, शीत पेयं, फळांचे रस वगैरे. परंतु, ही थंड पेयं मलावरोध कमी करण्यासाठी उपयोगी पडत नाहीत असे दिसते. तुम्ही जेवढे थंड पाणी (वा थंड पेयं) पिता त्यातला बराचसा भाग लहान आतड्यांमार्फत शोषला जातो. शरीराची द्रवहानी भरून काढण्यास उपयोगी पडतो व नंतर मूत्रविसर्जनावाटे शरीराबाहेर फेकला जातो. ते पाणी जितक्या मात्रेमध्ये आवश्य़क असते तितक्या मात्रेमध्ये मोठ्या आतड्यांपर्यंत पोहोचत नाही. पाणी मोठ्या आतड्यापर्यंत पर्याप्त प्रमाणात पोहोचले तरच तिथल्या मलाची कठीणता कमी हो‌ऊन तो मृदु होणार ना?

आणखी वाचा-Health Special: वरी, हरी अ‍ॅण्ड करी!, अ‍ॅसिडिटीची ही नेमकी कारणे काय आहेत?

थंड पदार्थाचा गुण जाणून घ्या

आयुर्वेदानुसारसुद्धा थंड पदार्थांचा गुण आहे स्तंभन अर्थात रोखणे, अडवणे, ज्या गुणानुसार थंड स्पर्शाची किंवा थंड गुणांची पेयं मलाला रोखतात, अडवतात. एकंदरच थंड पाण्याचा हा मोठाच दोष म्हणायला हवा की, ते मूत्रविसर्जन वाढवते मात्र मलविसर्जनास साहाय्यक होत नाही. त्यातही ज्या वातप्रकृतीच्या व्यक्ती असतात, त्यांच्या शरीरामध्ये स्वाभाविकरित्या कोरडेपणा असतो. त्यांच्या आतड्यामध्ये स्त्रवणारे नैसर्गिक स्त्राव इतरांच्या तुलनेमध्ये कमी असल्याने त्यांचा मल मुळातच कोरडा असतो, जो उन्हाळ्यामध्ये पाण्याच्याअभावी अधिकच कोरडा होऊन मलावरोध वाढतो.

सोपा घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्यांना हा मलावरोधाचा त्रास जाणवतो, त्यांच्यासाठी सोपा उपाय म्हणजे कोमट पाणी पिणे. उन्हाळ्यात कोमट पाणी पिण्याचा हा सल्ला कोणाला अगोचर वाटेल, पण ज्यांना कठीण मल होतो व त्यामुळे मलविसर्जन करताना त्रास होतो, त्यांच्यासाठी हा सहजसाध्य असा उपाय आहे. अर्थात मलावरोधाला कारणीभूत तंतुयुक्त आहाराचा अभाव, आहारामध्ये स्नेह म्हणजे तेलतुपाची कमी, चलनवलनाचा- व्यायामाचा अभाव (त्यातही विशेषकरुन पोटाच्या व्यायामाचा अभाव) या इतर कारणांचाही विचार करायला हवा. सांगण्याचा मथितार्थ हाच की, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यायलात, मात्र ते थंड असेल, तर मलावरोधाची तक्रार दूर होणार नाही.