Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार होते. त्यांनी एक नीतिशास्त्र रचले, ज्यामध्ये त्यांनी संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा सखोल उल्लेख केला आहे. चाणक्यजींनी नेहमीच आपल्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो त्याच्या जीवनात मोठी प्रगती होते. जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कोणत्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो हे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृतज्ञतेची भावना असावी: आचार्य चाणक्य सांगतात की ज्या सज्जनांच्या हृदयात इतरांवर उपकार करण्याची भावना असते त्यांना पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही. म्हणजे जे इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात, त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. 
अन्न वाया जाऊ नये: आचार्य चाणक्य यांच्यानुसार जो व्यक्ती अन्नाची किंचितही वाया घालवत नाही, अशा व्यक्तीच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. कारण अशा लोकांवर देवी लक्ष्मी प्रसन्न होते. कारण अन्नाची नासाडी करणे देखील ज्योतिषशास्त्रात अशुभ मानले गेले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti there is always happiness and prosperity in the life of such people prp
First published on: 08-03-2022 at 23:28 IST