प्रत्येक मुलांना सायकल चालवायला खूप आवडते. मुले कधी घराच्या आत, कधी गच्चीवर तर कधी अंगणात सायकल चालवताना दिसतात. अनेकवेळा तुम्ही सायकल घरच्या बाहेर अशीच ठेऊन देतात. दरम्यान काही वेळा सायकल या अधिक काळ बाहेर असल्याने सायकलमध्ये घाण साचते आणि पाणी साचल्याने गंजही येतो. अशा परिस्थितीत पालकांना सायकल बदलणे भाग पडते. तुमच्या मुलाच्या सायकललाही गंज चढला असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. घरी असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही सायकलवरील गंज अगदी सहज साफ करू शकता. चला तुम्हाला अशाच काही खास टिप्स आणि ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिंबू आणि बेकिंग सोडा वापरा

बेकिंग सोडा घराच्या स्वच्छतेसाठी खूप मदत करतो. यामध्ये असलेले एक्सफोलिएटिंग गुणधर्म गोष्टी स्वच्छ करण्यात मदत करतात. जर बेकिंग सोडामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळला तर ते अधिक चांगले स्वच्छ करते. यासाठी आधी पाणी गरम करून त्यात लिंबाचा रस टाकावा. आता या मिश्रणात बेकिंग सोडा मिसळा. यानंतर, या द्रावणाच्या मदतीने सायकलवरील गंज साफ करा. जुन्या टूथब्रशच्या मदतीने सायकल स्वच्छ करा आणि शेवटी स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा. तुमची सायकल पूर्णपणे स्वच्छ होईल आणि नवीन सारखी चमकेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child bicycle got rusted cleanse with the help of these easy tips scsm
First published on: 08-11-2021 at 17:59 IST