Flax Seeds Miraculous Benefits: हिवाळ्यात तुमचे शरीर निरोगी ठेवणे आणि तुमची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. ते अनेक महागड्या प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करतात. पण तुम्हाला माहितेय का? भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे कमी किमतीचे एक देशी सुपरफूड तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी फायदेशीर आहे.
खरं तर, जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्ससह विविध पोषक घटक असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. जवसाच्या बियांना सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि केसांसाठीदेखील फायदेशीर असते. परंतु, याचे सेवन कशा पद्धतीने करावे हे जाणून घ्या.
जवसाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर
सकाळी करा सेवन
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी जवसाचे सेवन करू शकता. कोमट पाण्याबरोबर मूठभर बारीक केलेले जवस घ्या. त्यामुळे चयापचय सुधारते आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. ते खाल्ल्याने हळूहळू भूक कमी लागते, ज्यामुळे वजन कमी होते.
गव्हाच्या पिठात मिसळा
तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये मिसळून पोळ्या बनवू शकता. जेव्हाही तुम्ही पोळ्यांसाठी कणीक मळता तेव्हा पिठात जवसाच्या बियांची पावडर घाला. अशा प्रकारे तुम्ही नियमितपणे जवसाच्या बिया खाऊ शकता.
जवस स्मूदी किंवा शेकमध्ये मिसळा
जर तुम्ही दररोज स्मूदी किंवा प्रोटीन शेक घेत असाल, तर तुम्ही त्यात जवसाच्या बियांची पावडर घालू शकता. या आरोग्यदायी पाककृतींमध्ये जवसाच्या बियांची पावडर टाकल्याने त्यांचे पौष्टिक मूल्य लक्षणीयरीत्या वाढते.
ओट्समधून खा
जर तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स खात असाल, तर त्यात जवसाच्या बिया घालू शकता. तुम्ही ओट्समध्ये जवसाची पावडरदेखील मिक्स करू शकता.
जवसाच्या बियांचे लाडू
तुम्ही जवस, गूळ, ओट्स आणि ड्रायफ्रुट्स घालून लाडू बनवू शकता. हे लाडू तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करतील. तसेच तुमची प्रकृतील चांगली ठेवतील.
