उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी एक ‘मॉडिफाय’ केलेली डान्सिंग स्कॉर्पिओ कार ताब्यात घेतली आहे. यासोबतच कारच्या मालकाला 41 हजार 500 रुपये दंडही आकारण्यात आला. या कारवर जातिवाचक उल्लेखही होता. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी डान्सिंग कारचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद पोलिसांकडे काही उपद्रवी तरुण रस्त्यावर कर्कश्य आवाजात गाणी वाजवत असून स्टंट देखील करत असल्याची तक्रार आली होती. नसूम अहमद (Nasum Ahmed) असं गाडीच्या मालकाचं नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. त्याने आपली स्कॉर्पिओ कस्टमाइज केली होती. आतून-बाहेरुन त्याने गाडी सजवली होती, तसेच मोठमोठे स्पीकरही लावले होते. चालकाने ब्रेक मारल्यानंतर ही कार जोरजोरात हलायची, त्यामुळे बघणाऱ्याला ती डान्सिंग कारप्रमाणे वाटायची.

आणखी वाचा- Bajaj Pulsar 220 ला चक्क ट्रॅक्टरचा टायर लावून सुसाट बाइक चालवतायेत तरुण, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून भविष्यात कोणी कार, ट्रॅक्टर किंवा बुलेट मॉडिफाय केल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dancing scorpio car seized by up police in ghaziabad owner fined rupees 41500 sas
First published on: 31-12-2020 at 09:32 IST