आधीच डेटा चोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेलं फेसबुक आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकवरुन युजर्सचा डेटा चोरी केला जात असून, त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, तब्बल 81 हजार युजर्सचं अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. हे सर्व अकाऊंट हॅक करुन युजर्सच्या मेसेज बॉक्समधील खासगी मेसेज विकले जात आहेत. ही माहिती प्रत्येक अकाऊंटमागे 6 रुपये 50 पैशांमध्ये विकली जात आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एफबीसेलर’ (FBSaler) नावाच्या एका युजरने 12 कोटी अकाऊंट्सची विक्री केल्याची माहिती ‘इंटरनेट फोरम’ला दिली. सप्टेंबर महिन्यात हा प्रकार घडला. सायबर सेक्युरिटी फर्म डिजिटल शॅडोजने प्रकरणाचा सखोल तपास केला असता तब्बल 81 हजार युजर्सची खासगी माहिती विकण्यात आल्याचं समोर आलं.

बीबीसीने माहिती पडताळून पाहण्यासाठी डेटा विकण्यात आलेल्या पाच फेसबुक युजर्सना संपर्क साधला. त्यांच्या नावे असणारे मेसेज दाखवले असता हे आपलेच मेसेज असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे यामध्ये फक्त मेसेज नाही तर फोटोंचाही समावेश होता. ज्या युजर्सचा डेटा विकला जात आहे ते प्रामुख्याने यूक्रेन, रशिया, यूके, अमेरिका आणि ब्राझील देशातील आहेत. इतर देशांमध्येही हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.

दरम्यान फेसबुकने सर्व युजर्सचे अकाऊंट्स सुरक्षित असून कोणतीही माहिती लिक किंवा अकाऊंट हॅक झालं नसल्याचं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Data of 81 thousand facebook users sold
First published on: 03-11-2018 at 13:37 IST