हिवाळ्यात सुट्टीच्या दिवसात अनेकजण बाहेर फिरायला जाण्याच्या विचार करतात. या हिवाळ्यात तुम्ही देखील ख्रिसमसला बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, तर सोबत जाताना तुमच्यासोबत लोशन, लिप बाम, सनस्क्रीन इत्यादी नेण्यास विसरू नका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यात थंड हवामान असल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ शकते, म्हणून लोशन आणि लिप बाम सोबत ठेवा. यामुळे तुमची त्वचा आणि ओठ मऊ राहतील. थंड वारे तुमचे केस निस्तेज आणि कोरडे बनवू शकतात, म्हणून कंडिशनर सोबत ठेवा, जे तुमच्या केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवेल आणि तुमचे केस चमकदार आणि मऊ ठेवतील.

हवेतील ओलावा नसल्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी सोबत हायड्रेटर ठेवा आणि झोपण्यापूर्वी ते लावा. त्यामुळे तुमची त्वचा मऊ राहण्यास मदत होते.

सनबर्न टाळण्यासाठी, तुमच्या त्वचेनुसार एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरण्यास विसरू नका. तसेच, सोया मिल्क, कोको आणि शिया बटर किंवा मध असलेले लिप बाम किंवा लोशन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे सोबत घ्यायला विसरू नका.

बाहेर फिरायला जाण्यापूर्वी बीबी क्रीम बाळगण्याची खात्री करा. याशिवाय, फाउंडेशनच्या बाटल्या ठेवण्याऐवजी, तुम्ही प्रवासात ही BB क्रीम ट्यूब तुमच्यासोबत घेऊ शकता. सोबत आयलायनर घ्यायला विसरू नका, प्रवास करताना डोळ्यांचा थकवा लपवू शकता. याशिवाय काही लिपस्टिक, मस्करा आणि फेस क्लिन्जर ठेवा.

तुमच्या नखांसाठी क्युटिकल ऑइल सोबत ठेवा. हे नखांना तुटण्यापासून आणि चमकदार दिसण्यासाठी प्रभावी ठरू शकते. याशिवाय तुम्ही जर बर्फाच्या डोंगरावर बर्फाचे गोळे बनवल्यानंतर हात मऊ राहण्यासाठी चांगल्या दर्जाची हँड क्रीम सोबत घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Definitely take these products with you vacation plan on mountain christmas scsm
First published on: 12-12-2021 at 13:12 IST