Desi Ghee vs Butter, What is Better: पावाला लावायला बटर संपलं असेल तर तूप लावावं का? किंवा पोळीला लावायला तूप शिल्लक नसेल तर बटर वापरावं का? दोन्ही प्रश्नांचं मूळ एकच, बटर आणि तूप या सारख्याच वस्तू आहेत का? आज आपण हा प्रश्न तर सोडवणार आहोतच पण त्याचबरोबर तूप कसं बनवावं, तुपात व बटरच्या पोषणात नेमका किती फरक आहे, कोणता पर्याय चांगला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत . चला तर मग..

तूप म्हणजे काय?

साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर तूप हे लोण्याला वितळवून बनवलं जातं. गायीच्या किंवा म्हशीच्या दुधापासून लोणी आणि लोण्याचं तूप बनू शकतं पण शक्यतो गायीच्या दुधाचं तूप हे साजूक मानलं जातं. लोणी गरम केल्यावर त्यातील द्रव स्वरूपातील फॅट्स व दुधाचे घन स्वरूपात रूपांतर होते. नंतर हे दुधाचे खरपूस झालेले कण काढून टाकले जातात व उर्वरित द्रव हे साठवून तूप तयार होते. यामुळेच लोण्याच्या तुलनेत तुपामध्ये कमी लॅक्टोज असते. तुपाचा वापर हा स्वयंपाकातच नव्हे तर काही सौंदर्य उत्पादनांमध्ये तसेच औषधांमध्ये सुद्धा केला जातो. मसाजसाठी किंवा बर्न्स, पुरळ यासाठी हे एक उत्तम मलम ठरते.

तूप बनवायचं कसं?

घरी साजूक तूप बनवणं हे किंचित वेळखाऊ असलं तरी अतिशय सोपं आहे. यासाठी आपल्याला काही दिवस दुधाची साय गोळा करायची आहे मग ही साय चांगली घुसळून त्याचं ताक व ताकातून लोणी बनवायचं आहे. हेच लोणी छान खरपूस होईपर्यंत कढवायचं आणि त्यातून खरपूस कण गाळून बाजूला काढायचे व उरलेलं तेलासारखं दिसणारं तूप साठवायचं. बाजारातून आणलेल्या लोण्याच्या गोळ्याला तापवून सुद्धा तुम्ही तूप बनवू शकता. तसेच अलीकडे व्हायरल झालेल्या हॅक नुसार तुपामध्ये थोडं मीठ घालून मग बर्फाचे खडे टाकून फेटून घेतल्यास आपल्याला बटर सुद्धा बनवता येऊ शकते. थोडक्यात काय कमी अधिक फरकाने हे दोन्ही पदार्थ दुधापासून बनवले जातात, त्यात फॅट्स असतात पण त्याच्या स्वरूपानुसार पोषणाचे प्रमाण बदलते. ते कसे, हे आता आपण पाहूया..

तूप आणि बटरच्या पोषणाची आकडेवारी

तूपलोणी/ बटर 
कॅलरीज: 120 kcalकॅलरीज: 102 kcal
फॅट्स: 14 ग्रॅमफॅट्स: 11.5 ग्रॅम
सॅच्युरेटेड फॅट्स : 10 ग्रॅमसॅच्युरेटेड फॅट्स: 7 ग्रॅम
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट: 3.5 ग्रॅममोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स: 3 ग्रॅम
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट: 0.5 ग्रॅमपॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स: 0.4 ग्रॅम
कोलेस्ट्रॉल: 36 मिग्रॅकोलेस्ट्रॉल: 31 मिग्रॅ

देशी तूप vs बटर

तूप आणि लोणी हे दोन्ही गाईच्या दुधापासून मिळत असल्यामुळे त्यातील पोषण आणि फॅट्सचे प्रमाण खूप सारखे आहे. पण तुपामध्ये दुग्धजन्य प्रथिनांचे (लॅक्टोज) प्रमाण लोण्यासारखे नसते, जे लोक दुग्धजन्य पदार्थ पचवण्यास सक्षम नसतात त्यांच्यासाठी तूप हा बटरपेक्षा उत्तम पर्याय आहे. शिवाय वापराच्या दृष्टिकोनातून तुपाचा बर्निंग पॉईंट हा बटरपेक्षा जास्त असल्याने हे तूप पदार्थ तळण्यासाठी उत्तम ठरते.

तूप किंवा बटर आरोग्यसाठी फायदेशीर आहे का?

तूप आणि लोणी या दोन्हीमध्ये संतृप्त चरबीचे (सॅच्युरेटेड फॅट्स) प्रमाण जास्त असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे सुचवले आहे की तुपाचे काही आरोग्यदायी फायदे असू शकतात. कमी ते मध्यम प्रमाणात सेवन केल्यावर तूप काही रोग टाळण्यास मदत करू शकते.

हे ही वाचा<< दररोज ‘इतक्या’ प्रमाणात पिस्ता खाल्ल्याने लैंगिक शक्ती होते बूस्ट? तज्ज्ञांनी सांगितली अचूक माहिती व प्रमाण

२०१८ मध्ये उत्तर भारतात केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की जे लोक जास्त तूप आणि मोहरीचे तेल कमी वापरतात त्यांच्या रक्तातील चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते, त्यांच्या रक्तातील LDL (खराब) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी असते आणि HDL (चांगले) कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असते. तुपामध्ये दुधाची शर्करा आणि प्रथिने देखील कमी असतात, ज्यामुळे लॅक्टोज सहन करू न शकणाऱ्यांसाठी हा एक योग्य पर्याय ठरतो. तुपामध्ये ब्युटीरेट ऍसिड असते, जे पाचक आरोग्यासाठी भूमिका बजावते आणि त्याचे दाहक-विरोधी प्रभाव असू शकतात थोडक्यात जळजळ रोखू शकतात.