उपचारांना दाद न देणाऱ्या नैराश्येमध्ये रुग्णाच्या चयापचय क्रियेतील उणिवा दूर करणे आवश्यक असते. त्यामुळे नैराश्येची लक्षणे निघून जातात व रुग्णात पूर्ण सुधारणा होते, असे संशोधनात दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संशोधनात अतिशय आश्वासक असे निष्कर्ष असून ते नैराश्येने जगण्याची आशा सोडलेल्यांना दिलासादायक आहेत. अमेरिकेतील पीटसबर्ग विद्यापीठातील वैद्यक विभागाचे प्राध्यापक डेव्हिीड लुइस यांच्या मते काही शारीरिक यंत्रणा या नैराश्येला कारण असतात, त्यात सुधारणा केली तर तुमचे जीवन सुधारते. नैराश्य हे माणसाला पूर्णपणे कोलमडवत असते. अनेकदा औषधांनी त्यात सुधारणा होत नाही अशा वेळी हा आशेचा किरण दिसला आहे. डिप्रेशन म्हणजे नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. अँटीडिप्रेसंट, औषधे, सायकोथेरपी यामुळे १५ टक्के रुग्णांवर काहीच उपचार यशस्वी होत नाहीत व लक्षणे दिसत राहतात, असे पीट स्कूल ऑफ मेडिसिनच्या लिसा पॅन यांचे म्हणणे आहे. नैराश्येतून दरवर्षी किमान दोनतृतीयांश आत्महत्या होत असतात. पाच वर्षांपूर्वी पॅन व डेव्हिड ब्रेन्ट या पीटसबर्ग विद्यापीठाच्या दोन जणांकडे एक मुलगा उपचाराला आला होता. त्याला खूप नैराश्य होते, त्याच्यावर काही वर्षे उपचार करूनही त्याला बरे वाटत नव्हते. अनेक जैवरासायनिक तपासण्या केल्या असता त्याच्यात सेरेब्रोस्पायनल फ्लुइडची कमतरता दिसली. त्याचे नाव बायोपटेरिन व ते प्रथिन मेंदूच्या अनेक संदेशवहन रसायने म्हणजे न्यूरोट्रान्समीटर्सच्या संश्लेषणात महत्त्वाचे ठरते. त्या मुलाला बायपटेरिन दिल्यानंतर त्याच्यातील नैराश्येची सगळी लक्षणे बंद झाली व तो आज उत्तम विद्यार्थी आहे व व्यवस्थित आहे. त्यानंतर मग नैराश्य असलेल्या प्रौढांवर संशोधन करण्यात आले, जे नैराश्येवरील उपचारांना अजिबात दाद देत नाहीत त्यात असे दिसून आले की, ३३ टक्के प्रौढ किंवा तरुणांमध्ये चयापचयात दोष दिसून आले. त्यांची सोळा नियंत्रणे बिघडलेली होती. काही मेटॅबोलाइट्स हे प्रत्येक रुग्णात वेगळे दिसले. ६४ टक्के रुग्णांमध्ये असे दिसले की त्यांच्यात न्यूरोट्रान्समीटरच्या चयापचयात कमतरता आहेत. त्यामुळे काहीही औषध दिले तरी नैराश्य कायम राहते. त्यामुळे चयापचयाच्या दिशेने आता संशोधन करणे गरजेचे आहे, कारण त्यामुळेच औषधे देऊनही काही रुग्ण बरे होत नाहीत. अशा काही रुग्णांमध्ये संबंधित कमतरता दूर केली असता त्यांच्यात नैराश्येचा मागमूसही राहिला नाही. ते उपचारांना प्रतिसाद देऊ लागले असे पॅन यांचे म्हणणे आहे. आपल्या आताच्या उपचारपद्धतींना जेथे मर्यादा आहेत तेथे ही नवी वाट खुणावते आहे. काही लोकांसाठी तो आशेचा किरण आहे असे त्या म्हणाल्या. अमेरिकन जर्नल ऑफ सायकिअ‍ॅट्री या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digestive system shortcomings on measures to eliminate depression
First published on: 24-08-2016 at 01:54 IST