गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा फटका सहन करणारे ऑटो सेक्टर आता पुन्हा एकदा हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. टाटा मोटर्सनं सप्टेंबर महिन्यात गाड्यांवर मोठी सूट जाहीर केली आहे. या अंतर्गत टाटा मोटर्सच्या Harrier SUV, Nexon, Tiago, Tigor या गाड्यांवर मोठी सूट देण्यात येत आहे. परंतु Tata Altroz वर कोणतीही ऑफर देण्यात येत नाही. ग्राहकांना ऑनलाइन अथवा शोरूममध्ये जाऊन गाडी बूक करता येऊ शकते. गाड्यांच्या निरनिराळ्या मॉडेल्सवर डिलरशिपकडून फ्रन्टलाइन वर्कर्सना ५ हजार रूपयांपर्यंत अतिरिक्त सूट देण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सप्टेंबर महिन्यात Tiago १५ हजार रूपयांची सूट देण्यात येत आहे. जर कोणत्याही ग्राहकाला आपली जुनी गाडी एक्सचेंज करून Tiago खरेदी करायची असल्यास १० हजार रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. तर कॉर्पोरेट कस्टमर्सना ३ हजार रूपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे.

Tata Tigor वर १५ हजार रूपयांचे कॅश बेनिफिट आणि तितक्याचं किंमतीचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. Tata Nexon वर केवळ १५ हजार रूपयांचं एक्सचेंज बेनिफिट देण्यात येत आहे. तसंच ते केवळ डिझेल मॉडेल्ससाठीच देण्यात येणार आहे. Tata Harrier च्या XZ+, XZA+ व्हेरिअंट आणि डार्क एडिशन सोडून अन्य मॉडेल्सवर २५ हजार रूपयांपर्यंतचं कॅश बेनिफिट देण्यात येत आहे. तसच ४० हजार रूपयांपर्यंतचं एक्सचेंज बेनिफिटही देण्यात येत आहे. याप्रकारे हॅरिअरवर एकूण ६५ हजार रूपयांचा फायदा दिला जात आहे. Tata Harrier Dark Edition, XZ+ आणि XZA+ वर ४० हजार रूपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे.

टाटा मोटर्सनं नुकतंच Nexon चं Nexon XM(S) लाँच केली आहे. सनरूफसारखे प्रिमिअम फीचर्स यात देण्यात आले असून दिल्लीत या गाडीची एक्स शोरूम किंमत ८.३६ लाख ते १०.३० लाखांपर्यंत आहे. याव्यतिरिक्त Harrier मध्ये XT+ हे व्हेरिअंटदेखील आलं आहे. या गाडीत पॅनोरॅमिक सनरुफ देण्यात आलं आहे. Tata Harrier XT+ ची एक्स शोरूम इंट्रोडक्टरी किंमत १६.९९ लाख इतकी आहे. ही किंमत केवळ सप्टेंबर महिन्यात बूक करणाऱ्या गाड्यांसाठीच असणार असणार आहे. १ ऑक्टोबरपासून या गाडीची किंमत वाढणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discounts up to rupees 65000 on tata harrier tiago and nexon in september 2020 jud
First published on: 08-09-2020 at 16:45 IST