तुमच्या बाबतीत असे कधी होते का की, तुम्ही एखादे काम करत असता पण अचानक तुमचे लक्ष दुसरीकडेच भरकटते आणि तुम्ही भलत्यात गोष्टी करु लागता. असे होण्यामागचे कारण म्हणजे एकाग्रता शक्ती कमी होणे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे एकाग्रता कमी झाल्याचे दिसून येते. यात सतत ऑनलाईन काही ना काही नवीन गोष्टी पाहण्याची, ऐकण्याची सवय झाल्याने तुम्ही एका ठिकाणी जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही.

परिणामी काही काळानंतर आपले मन काम सोडून इतर गोष्टींचा जास्त विचार करू लागते. जास्तवेळ टीव्ही, मोबाईल पाहणे, चुकीची लाइफस्टाइल आणि मेडिकल कन्डीशनमुळेही एकाग्रता कमी होऊ शकते. परंतु काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही ऑफिसचे काम, अभ्यास करताना लक्ष केंद्रित करु शकता. तसेच तुमची एकाग्रता वाढू शकते. ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास किंवा काम चांगल्या पद्धतीने होऊ शकले.

१) मल्टीटास्किंग बनू नका

अनेक वेळा आपण एकाच वेळी दोन किंवा अधिक कामे करण्याचा प्रयत्न करतो. याला मल्टी टास्किंग म्हणतात. यामुळे तुमचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित होऊ शकत नाही आणि सर्व काम करण्यास विलंब होऊ शकतो किंवा चुका होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मल्टीटास्किंग काम करु नका. एका वेळी एकच गोष्ट करा. यामुळे लक्ष केंद्रित करणे सोपे होते.

२) मेडिटेशन करा

रोज मेडिटेशन करा. यासाठी डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. यामुळे कोणत्याही गोष्टी लक्ष केंद्रीत करण्यात खूप मदत होऊ शकते. तुमच्या घरात किंवा बाहेर शांत ठिकाणी बसून तुम्ही मेडिटेशन करु शकता. दररोज १० मिनिटांच्या मेडिटेशनने तुम्ही दिवसाची सुरू केल्यास एकाग्रता वाढण्यास मदत होईल.

३) शारीरिक हालचाली करा

दिवसभर एकाच जागी बसल्याने मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका. लहान ब्रेक घ्या, दिवसातून ३० मिनिटे व्यायाम करा. तुम्ही रोज शारीरिक हालचाली करत असाल तर तुम्हाला कॉग्निटिव्ह फंक्शन सुधारण्यास मदत होऊ शकते.

खोबरेल तेलात ‘या’ तीन गोष्टी मिसळून लावल्यास पांढरे केस होतील काळे! जाणून घ्या डॉक्टरांचे मत

४) पुरेशी झोप घ्या

झोप पूर्ण झाल्यास आपले मन शांत होते. झोपेच्या कमतरतेमुळे खूप थकल्यासारखे वाटते, अवस्थता येते. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगले काम करू शकेल आणि तुमचा फोकसही वाढेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) लक्ष भरकटवणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा

अनेकदा काम करताना आपण आपला मोबाईल तपासू लागतो किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करू लागतो. या कारणांमुळे कामावर लक्ष केंद्रित करणे खूप कठीण होते. त्यामुळे काम करताना गरज नसल्यास मोबाईल दूर ठेवा किंवा त्याचे नोटिफिकेशन बंद करा. यामुळे तुमचे लक्ष पुन्हा पुन्हा इकडे-तिकडे भटकणार नाही.