Side Effects Of Stale Food: निरोगी राहण्यासाठी नेहमीच ताजे आणि गरम अन्न खाणे फायदेशीर आहे. पण, आजच्या धावपळीच्या जीवनात काही जण वेळ वाचवण्यासाठी एकाच वेळी जास्त जेवण बनवतात आणि ते फ्रिजमध्ये ठेऊन काही तासांनंतर गरम करून खातात. शिवाय बरेच लोक रात्रीचे उरलेले अन्न फेकले जाऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशीही खातात. पण, तुम्हाला माहिती आहे का की शिळे अन्न खाल्ल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. शिळ्या अन्नात हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. शिवाय हे अन्न खाल्ल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला शिळे अन्न खाल्ल्यानंतर आरोग्यावर काय गंभीर परिणाम होऊ शकतो हे सांगणार आहोत.

शिळे अन्न खाण्याचे घातक परिणाम

विषबाधा

शिळे अन्न खाण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे अन्नातून विषबाधा होणे. खरं तर, जर अन्न शिजवल्यानंतर दोन तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवले नाही तर त्यात अनेक बॅक्टेरिया वाढू लागतात, त्यामुळे शरीरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. असे अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. विशेषतः शिळा भात आणि बटाट्याचे पदार्थ खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते.

पचन समस्या

शिळ्या अन्नात वाढणारे बॅक्टेरिया पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात. हे बॅक्टेरिया पचन प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. यामुळे तुम्हाला पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त होऊ शकते. कमकुवत पचनसंस्था असलेल्या लोकांनी चुकूनही शिळे अन्न खाऊ नये, यामुळे तुम्हाला पोटाच्या संसर्गाची तक्रारदेखील होऊ शकते.

पौष्टिक कमतरता

जेव्हा अन्न जास्त आचेवर शिजवले जाते तेव्हा त्यातील काही आवश्यक पोषक घटक नष्ट होतात. शिजवलेले अन्न रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्याची स्थिती आणखी वाईट होते. असे अन्न पुन्हा गरम करून खाल्ल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही. तसेच त्यात असलेल्या बॅक्टेरियामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात.

उलट्या आणि अतिसार

जर अन्नातून विषबाधेची समस्या जास्त वाढली तर उलट्या आणि जुलाब होऊ शकतात, त्यामुळे शरीरातून जास्त पाणी बाहेर पडते आणि डिहायड्रेशन होऊ शकते. विशेषतः लहान मुलांना जुलाब लवकर होतात, त्यामुळे उरलेले अन्न पुन्हा गरम करून त्यांना खायला देऊ नये.

ताप

शिळ्या अन्नात असलेले हानिकारक जीवाणू शरीरात संसर्ग निर्माण करू शकतात. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या जीवाणूंशी लढते, तेव्हा शरीराचे तापमान वाढू लागते; यामुळे काही लोकांना तापाची तक्रारदेखील होऊ शकते.

या शिळ्या गोष्टी खाऊ नका

शिळे अन्न खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषतः शिळा भात, अंडी, सीफूड आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळावे. या सर्व गोष्टींमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढतात, म्हणून या शिळ्या गोष्टी खाणे टाळावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बनवलेले अन्न किती तासांनंतर खाऊ नये?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, अन्न शिजवल्यानंतर लगेच खाणे चांगले आहे. परंतु, जर लगेच हे अन्न खाणे शक्य नसेल तर ते १ ते २ तासांच्या आत खावे. शिजवलेले अन्न ६-८ तासांनंतर खाण्यायोग्य राहत नाही.