Viral Video : अनेकदा लहान मुले भिंतीवर चित्र काढताना दिसतात. हातात मिळेल ते भिंतीवर रंगवून काढतात. लहान मुलांचा हा आवडता छंद आहे. अनेकदा पालक मुलांच्या या छंदापासून त्रासतात. जर तुमच्या मुलांनी भिंती रंगवून खराब केल्या असतील तर टेन्शन घेऊ नका आज आपण एक हटके ट्रिक जाणून घेणार आहोत. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही मुलांनी पेनानी भिंती रंगवल्या असतील तर तुम्ही हे डाग सहज काढू शकतात. या याविषयी जाणून घेऊ या

या एका वस्तूने स्वच्छ करा पेनाने रंगवलेल्या भिंती

इन्स्टाग्रामवर प्राजक्ता साळवे यांनी एक व्हिडीओ शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी भिंतीवरील रंग किंवा पेनाचे डाग पुसून काढण्यासाठी एक चांगला उपाय सांगितला आहे. त्या सांगतात की सुरूवातीला भिंतीवर ज्या ठिकाणी पेनाने रंगवले तिथे कोलगेट लावा. ज्या ठिकाणी भिंतीवर पेनाने रेषा ओढल्या आहे त्या ठिकाणी कोलगेट लावून घ्या त्यानंतर जुन्या टूथब्रश हलक्या हातानी कोलगेटवर घासा. त्यानंतर दोन ते तीन मिनिटे तसेच ठेवा. ओल्या कपड्याने चांगल्याने पुसून घ्या पेनाचे डाग लगेच निघतात. व्हिडीओत त्या ही ट्रिक कशी वापरायची, हे करून सुद्धा दाखवतात. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्ही सुद्धा हा हटके जुगाड वापरून तुमच्या घरातील पेनाने रंगवलेल्या भिंती स्वच्छ करू शकता. फक्त दहा रुपयांच्य्या कोलगेटनी तुम्ही हा अनोखा जुगाड करू शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : Video : गायींबरोबर पंगा घेणे तरुणाला पडले चांगलेच महागात, थेट हवेत उडवले अन्…, व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्राजक्ता साळवे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमचे पण मुलं अशाच भिंती रंगवतात का??” हा व्हिडीओ पाहून तुमचाही खूप मोठा प्रश्न सुटेल. या खास ट्रिकची अनेकांना मदत होऊ शकते. प्राजक्ता साळवे या त्यांच्या अकाउंटवरून अनेक घरगुती समस्यांवर चांगले उपाय सांगणारे व्हि़डीओ शेअर करत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर हजारो लोक फॉल करतात.