दरआठवडय़ाला बदामासारखा सुका मेवा खाल्याने दयाच्या ठोक्यांसंबंधीच्या रोगांचा आणि इतर दय रोगांचा धोका कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. सुक्या मेव्याच्या नियमित सेवनामुळे दयविकाराच्या झटक्याचा धोकादेखील कमी होतो. परंतु याबाबत अधिक संशोधनाची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

हा अभ्यास जर्नल हार्ट या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्वीडनमधील कॅरोलिन्स्का संस्थेच्या संशोधकांनी ४५ ते ८३ या वयोगटातील ६१,००० लोकांची जीवनशैली आणि आहारविषयक माहिती मिळवली. त्यानंतर त्यांच्या दयआरोग्याचा मागोवा १७ वर्षांपर्यंत (२०१४ च्या अखेपर्यंत) किंवा त्या व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत घेण्यात आला. सुक्या मेव्याचे सेवन न करणाऱ्यांच्या तुलनेत जे लोक सुक्या मेव्याचे सेवन करतात ते अधिक शिकलेले असून त्यांची निरोगी जीवनशैली असल्याचे आढळून आले. या लोकांमध्ये धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असण्याची शक्यतादेखील कमी होती. त्याचप्रमाणे हे लोक शारीरिकदृष्टय़ा अधिक कार्यक्षम असून हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन करतात. सुक्या मेव्याचे सेवन करण्याचा संबंध हृदय विकाराच्या झटक्याचा धोका कमी असण्याशी जोडण्यात आला आहे.

नियमित सुका मेवा खाणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक चांगले असल्याचे संशोधकांना आढळले. बदाम हे प्रथिने आणि तंतूमय पदार्थाचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे रक्त शर्करेची निरोगी पातळी राखण्यास मदत होते. त्याचबरोबर मधुमेंहीमध्येही रक्ताच्या शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे आहारतज्ज्ञ रितिका समदार यांनी सांगितले. आठवडय़ातून तीन ते चार वेळा सुकामेवा खाल्ल्याने हृदय रोगाचा धोका १८ टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधकांना आढळले.