Body Detox Drinks: बॉडी डिटॉक्स ड्रिंक्स पावसाळ्यासाठी खूप फायदेशीर असते. परंतु, या ऋतूमध्ये अनेक आजारांना धोकादेखील वाढतो. खरंतर, पावसाळ्यात वातावरणात जास्त आर्द्रता असते, ज्यामुळे बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी वेगाने वाढते; ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. अशा परिस्थितीत शरीराला आतून मजबूत बनवण्यासाठी हा रस पिणं खूप फायदेशीर आहे.
बाजारात असे अनेक प्रकारचे पदार्थ उपलब्ध आहेत जे शरीराला डिटॉक्स करण्याचा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा दावा करतात. परंतु, यामध्ये धोकादायक रसायने असतात, जी आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. तथापि, तुम्ही घरी एक निरोगी पेय तयार करू शकता, जे केवळ आरोग्यदायी नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासदेखील खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही टोमॅटो, डाळिंब, गाजर आणि बीटपासून हे निरोगी पेय बनवू शकता.
निरोगी पेय बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ टोमॅटो
- १ गाजर
- १ बीट
- अर्ध्या डाळिंबाचे दाणे
- २ ताजे आवळे
- अर्ध्या लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
- १ ग्लास थंड पाणी
घरच्या घरी कसे बनवायचे निरोगी पेय?
- हा रस तयार करण्यासाठी सर्वप्रथम भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टोमॅटो, गाजर आणि बीटाचे लहान तुकडे करा.
- हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घाला आणि त्यावर डाळिंबाचे दाणे, आवळा आणि पाणी टाकून त्याचा रस बनवून घ्या.
- त्यात थोडे पाणी घालून हे मिश्रण व्यस्थित गाळून घ्या.
- यामध्ये तुम्ही लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून ते पिऊ शकता.
- पावसाळ्यात हा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.