Water With a Jaggery: शतकानुशतके भारतीय संस्कृतीत त्याचा औषधी आणि पौष्टिक फायद्यांसाठी वापर केला जात आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवणे असो किंवा पचनक्रिया सुधारणे असो; गुळाचे असंख्य फायदे आहेत, ज्यामुळे गूळ तुमच्या आहारात असणे फायद्याचे मानले जाते. गूळ शरीराला आवश्यक खनिजेच पुरवत नाही, तर तो खाल्ल्याने त्वचेपासून केसांपर्यंत अनेक सकारात्मक बदल दिसू लागतात. जर तुम्हाला तुमचे केस आणि त्वचा नैसर्गिक पद्धतीने निरोगी बनवायची असेल, तर सकाळी उठल्यानंतरच्या गुळासह पाणी पिण्यास सुरुवात करा.

गूळ आणि पाण्याचे कसे सेवन करावे?

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी घेऊन, त्यात सुमारे १०-१५ ग्रॅम शुद्ध देशी गूळ घाला. चव वाढविण्यासाठी तुम्ही त्यात लिंबाचे काही थेंबदेखील घालू शकता. त्यानंतर ते पाणी प्या.

त्वचा उजळते

चमकदार त्वचेसाठी गुळाचा तुकडा खा आणि वर एक ग्लास पाणी प्या. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. गूळ आणि पाणी या दोन्ही गोष्टींचे एकत्रित सेवन केल्याने त्वचा साफ होते आणि कोलेजन बूस्टर म्हणून काम करतात, ज्यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केसांसाठी फायदेशीर

एक तुकडा गूळ खाऊन पाणी प्यायल्याने केस काळे होण्यास मदत होते. गुळात भरपूर प्रमाणात लोह असतो, ज्यामुळे केस काळे होण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. गुळात व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्सदेखील भरपूर प्रमाणात असते, जे कमकुवत केसांसाठी उपचार ठरू शकतात. त्याशिवाय केसांसाठी गुळाचे इतर फायदे म्हणजे मॅग्नेशियम, पोटेशियम व झिंक ही खनिजे टाळूच्या आरोग्यात योगदान देतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात. अशा प्रकारे सकाळी सर्वांत आधी एक तुकडा गूळ खा आणि वरून एक ग्लास पाणी प्या.