जर तुमचं मतदान ओळखपत्र हरवलं असेल तर त्याची डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्लालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. केंद्रीय निवडणूक आयोग सोमवारपासून e-EPIC सुविधा सुरू करत आहे. याद्वारे तुम्ही घरबसल्या मतदार ओळखपत्राची पीडीएफ कॉपी डाउनलोड करु शकाल. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डिजीटल मतदान ओळखपत्राची सुरूवात होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही सुविधा लाँच झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय मतदार ओळखपत्र तुमच्या मोबाइल फोन किंवा पर्सनल कंम्प्युटरवर डाउनलोड करु शकतात. याशिवाय हे इ-वोटर आयडी कार्ड डिजिटल लॉकरमध्येही सुरक्षित ठेवता येईल, तसेच डिजिटल फॉर्मेटमध्ये प्रिंटही करता येईल. निवडणूक आयोग दोन टप्प्यात ही सेवा सुरू करणार आहे. आजपासून अर्थात २५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत केवळ नवीन मतदार, ज्यांनी वोटर आयडीसाठी अर्ज केलाय आणि ज्यांचे मोबाइल नंबर आयोगाकडे रजिस्टर्ड आहेत असे युजर डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करु शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E epic digital voter id card just like aadhaar and pan card now download your voter id online sas
First published on: 25-01-2021 at 12:50 IST