लग्न हा मुला-मुलींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. आयुष्याच्या या नव्या टप्प्यात पाऊल टाकताना हल्ली मुला-मुलींना अनेक प्रश्न सतावत असतात. यातही मुलींना जास्त अपेक्षा असल्याचे पाहायला मिळते. मी तर नोकरी करते, त्याच्या इतकाच वेळ घराबाहेर असते, घरातल्या इतरही जबाबदाऱ्या पार पाडते मग त्यालाही काही गोष्टी यायलाच हव्यात, असे त्यांचे मत असते. शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनियल साईटने नुकतेच एक सर्वेक्षण केले. अनेक भारतीय मुलींना आपल्या संभाव्य नवऱ्याला जेवण बनवता येते का हे जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलींनी मुलांच्या मागणीला हो म्हणावे यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे माहिती करुन घेणे महत्त्वाचे आहे. ऑनलाईन पोलमध्ये ६८०० जणांकडून (४७ टक्के महिला आणि ५३ टक्के पुरुष) प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोडीदाराला निवडताना इच्छुकांनी हो म्हणण्याआधी कोणते महत्त्वाचे तीन प्रश्न विचारले हे सर्वेक्षणामध्ये जाणून घेण्यात आले. यामध्ये ३६ टक्के महिलांनी मुलगा वेगळा राहतो की एकत्र कुटुंबपद्धती आहे असे विचारले तर ३० टक्के मुलींनी माझ्या करिअरला तुझा पाठिंबा आहे का असे विचारले. याशिवाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे २६ टक्के महिलांनी जेवण बनवता येईल का, असे विचारले. मात्र पुरुषांच्याबाबत ही आकडेवारी काहीशी वेगळी होती. ३६ टक्के पुरुषांनी तुला माझ्या कुटुंबाबरोबर राहण्याची इच्छा आहे का, तर ३४ टक्के पुरुषांनी लग्नानंतर नोकरी करण्याचा विचार आहे का असे विचारले. तर केवळ १९ टक्के पुरुषांनी मुलींना जेवण बनवता येते का असे विचारले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expectations of women from prospective partner
First published on: 15-06-2017 at 16:04 IST