अँकर कंपनीच्या साऊंडकोअर या ब्रॅण्डने ‘इन्फिनी’ हा नवीन साऊंडबार भारतात आणला आहे. एखाद्या सिनेमागृहासारख्या ध्वनीचा अनुभव देणाºया या साऊंडबारमध्ये दुहेरी बेस यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच सबवुफरही सोबतच देण्यात आले आहेत.  हा स्पीकर अतिशय कमी जागेत अगदी टीव्हीच्या वर बसवता येतो. हा स्पीकर टीव्हीखेरीज अन्य उपकरणांनाही जोडता येतो. त्यासाठी यात ऑक्स कनेक्शन आणि ब्लूटूथ सुविधाही पुरवण्यात आली आहे.

किंमत: ९९९९ रुपये

‘इन्फिनिक्स’चा ‘नोट ११ एस’

किंमत : ११९९९ रुपयांपासून पुढे इन्फिनिक्स या ट्रान्सियान ग्रुपच्या ब्रॅण्डने ‘नोट ११’ या सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन भारतात आणले आहेत. यापैकी नोट ११ मध्ये चार जीबी रॅम, ६४ जीबी स्टोअरेज, ६.७ इंचाचा एफएचडी डिस्प्ले, हेलिओ जी८८ प्रोसेसर ही वैशिष्ट्ये आहेत. तर, नोट ११एस  ६ जीबी रॅम / ६४ जीबी व ८ जीबी रॅम / १२८ जीबी स्टोरेज पर्याय या दोन प्रकारांत उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये ६.९५ इंचाचा एफएचडी प्लस डिस्प्ले आहे.  यातील प्रोसेसरही हेलिओ जी ९६ अधिक प्रगत आहे.   दोन्ही डिवाइसेस आधुनिक अँड्रॉइड ११ सह आधुनिक एक्सओएस ७.६ स्किनवर संचालित आहेत. दोन्ही फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा असून पुढील बाजूस १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. यातील बॅटरी ५ हजार एमएएच क्षमतेची असून ती दीर्घकाळ चालते, असा कंपनीचा दावा आहे.

मोटोरोलाचा ५जी फोन

मोटोरोलाने मोटो जी ५१ फाइव्ह जी सादर केला आहे.  यामध्ये ६.८ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीर्टांस्कगसाठी यात स्नॅपड्रॅगन ४८० व प्रोसेसर ४ जीबी रॅम पुरवण्यात आली असून अंतर्गत स्टोअरेज क्षमता ६४ जीबी इतकी आहे. यात पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून जलद चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.  या फोनमध्ये ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा  आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. 

किंमत : १४,९९९ रुपये.

‘जबरा’चा ‘पॅनकास्ट २०’

‘जबरा’ या ब्रॅण्डने भारतात पॅनकास्ट २० हे व्हिडिओ कॉन्फर्रंन्सग उपकरण आणले आहे.

हा कॅमेरा वैयक्तिक व्हिडीओ कॉन्फर्रंन्सगचा अनुभव देतो. पॅनकास्ट २० मध्ये प्रीमियम एआय -चालित फोर के अल्ट्रा-एचडी व्हिडीओ गुणवत्ता,  एआय-चालित इंटेलिजेंट झूम, चांगल्या प्रतिमेसाठी इंटेलिजेंट लार्इंटग ऑप्टिमायझेशन या सुविधा आहेत. जोडीला

पिक्चर-इन-पिक्चर सुविधा व डेटाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी  शक्तिशाली ऑन-बोर्ड एआय प्रोसेसरसुद्धा आहे. तसेच पॅनकास्ट  २०चे  इंटिग्रेटेड प्रायव्हसी कव्हर आवश्यक असेल तेव्हा वापरकत्र्याला गोपनीयतेची हमी देतो. पॅनकास्ट २० हे पूर्णत: प्लग-अँड-प्ले असल्यामुळे वापरण्यासाठी खूप सोपे आहे.

किंमत: अंदाजे २२ हजार रुपये.