वॉडरोबमध्ये अनेक छोटय़ाछोटय़ा गोष्टी असतात. ज्या स्वस्तात स्ट्रीट मार्केटवरून घेतलेल्या असतात. वर्षांनुवर्षे एका कोपऱ्यात पडलेल्या असतात; पण अडचणीला मदतीस धावून येतात. अगदी दोन-तीन वर्षे जुना लूझ टी-शर्ट, योग्य फिट होणारी जीन्स, छोटंसं कानातलं या गोष्टीचं यात हक्काचं स्थानच. बरं यांची गंमत म्हणजे यांना लेटेस्ट ट्रेण्ड्स, स्टाइलचं वावडं नसतं. त्या ‘ऑलवेज इन ट्रेण्ड’ असतात. बॉलीवूडच्या एखाद्या एव्हरग्रीन नायिकेप्रमाणे. ‘खालीच बाजारात जायचं आहे’ ते ‘आय हॅव निथग टू वेअर’ सिंड्रोमपर्यंत प्रत्येक वेळी ते मदतीला येतात. कपाटातल्या चप्पलेचेसुद्धा असेच आहे. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, इतक्या वेगवेगळ्या रंगाढंगांत बाजारात उपलब्ध असलेली ही चप्पल वॉर्डरोबमध्ये खूप महत्त्वाची असते.

काही वर्षांपूर्वी पादत्राणे म्हणजे चप्पल हेच समीकरण होतं. अगदी ‘पादुका’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या रूपापासून ते आजच्या चप्पल किंवा स्लिपपर्यंत त्यांची रूपं बदलत गेली पण त्याचं महत्त्व तसूभरपण कमी झालं नाही. कोल्हापुरी चप्पल, जोधपुरी चप्पलसारखे यांच्यातील काही भिडू अगदी बाजारातून कधीच निवृत्त होतं नाहीत तर स्लीपर्स प्रत्येक सीझननुसार आपलं रूप बदलून येतात. उन्हाळ्यामध्ये पायाला घाम येतो म्हणून बंद शूज, हील्स यांना विश्रांती दिली जाते. पावसाळ्यात तर हील्सचा पर्याय बंदच होतो, पण कॅनव्हास शूज, लेदर शूजसुद्धा कपाटात जातात. त्यामुळे चप्पल्स माना वर काढू लागतात. हीच बाब लक्षात घेऊन सध्या बाजारात विविध स्टाइल्सच्या चप्पल्स दाखल झाल्या आहेत.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा

स्लिपर सॉक्स

उन्हाळ्यात पाय झाकायला बंद बूट लागतात, पण स्पोर्ट शूजसारख्या प्रकारांमध्ये पायात घाम जमा होतो. त्यामुळे ते नकोसे वाटतात. कित्येक जण पावसाळ्यात ऑफिसमध्ये चपलांचा दुसरा जोड ठेवतात. जेणेकरून दिवसभर भिजलेली सॅण्डल घालून बसावे लागत नाही. अशा वेळी स्लिपर सॉक्स हा प्रकार मदतीस येतो. कॅनव्हास किंवा जाड कापडाच्या या चप्पल दिसायला सॉक्सप्रमाणे असतात. तळव्यांना एक सोलचा जोड आणि मागच्या बाजूला झिप देऊन त्यांना चप्लेच स्वरूप दिलेलं असतं. या स्लिपर्स वापरायला सोयीच्या असतात, तसेच उन्हापासून संरक्षणसुद्धा करतात.

वेजेस चप्पल

पावसाळ्यातसुद्धा हील्स घालायची इच्छा असेल तर वेजेस चप्पल हा पर्यायसुद्धा तुमच्याकडे आहे. पावसाळ्यात सिलेटोज, प्लॅटफॉर्म हील्सप्रमाणे मागच्या बाजूस हील्स असलेल्या सॅण्डल्समुळे घसरून पडण्याची भीती असते. त्यामुळे वेजेसचा पर्याय उत्तम ठरतो. चप्पलांमध्येसुद्धा सध्या वेजेस हील्स उपलब्धो आहेत. एरवी चपलेला एकच सोल असल्याने जास्त वेळ चालल्यास पाय दुखू लागतात. पार्टीमध्ये अशा चप्पल अगदीच साध्या वाटतात. त्यामुळे यांची जागा आता वेजेस चप्पल घेऊ लागल्या आहेत. या चपलांवर स्टड्स, टिकल्या, िपट्र्स वापरून सुंदर डिझाइन केलेली असते. त्यामुळे त्यांना ग्लॅमर येतं आणि त्या वेगवेगळ्या निमित्तांसाठी सहज वापरता येतात.

सॅण्डल चप्पल

सॅण्डल चप्पल म्हणजे ‘किटोज’ हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून अजूनही बाजारात आहे. एरवी ‘सॅण्डल हा आमचा प्रांत नाही,’ असे म्हणणारी पुरुषमंडळीसुद्धा किटोज या सॅण्डल चप्पल प्रकारच्या प्रेमात आहेत. किटोज कॉलेज किंवा रोजच्या वापरासाठी योग्य असतात. पण त्यांचं रूप फारसं देखणं नसतं, त्यामुळे पार्टी, गेटटूगेदर, नोकरीसाठीची मुलाखत, मीटिंग्स अशा प्रसंगी त्यांना मिरवता येत नाही. त्यामुळे ते काहीसे मागे पडत होते. सध्या या सॅण्डल चप्पल प्रकारात अनेक प्रकार येऊ लागले आहेत. यांचं वैशिष्टय़ म्हणजे या चपलांना मागच्या बाजूने बक्कल असते. त्यामुळे पायाला पकडून बसतात. विशेषत: मुंबईमध्ये गर्दीच्या वेळी लोकल, बस पकडताना चपलेला मागे बक्कल असेल, तर ती पडण्याची भीती नसते. त्यामुळे हा प्रकार रोजच्या प्रवासात सोयीचा ठरतो.

फंकी फ्लिप फ्लॉप

स्लिपर्स किंवा चप्पल्सचं ‘कुल’ भावंडं म्हणजे ‘फ्लिप फ्लॉप’. बिचवेअर म्हणून तरुणाईमध्ये फ्लिप-फ्लॉप पसंतीच होतंच. पण सध्या रोजच्या वापरासाठीही यांचा उपयोग होतो. एरवी पावसाळ्यात चापलांनी चिखल उडून जीन्स, लेिगगला लागतो. त्यामुळे या चपला पावसाळ्यात घालणं टाळल जायचं. पण हल्ली फ्लिप-फ्लॉपचा सोल जाडा असतो. त्यामुळे चिखल उडण्याचा त्राससुद्धा कमी होतो. सोशल मीडियामुळे इमोजी तरुणाईच्या लाडक्या झाल्या आहेत. मिनियम्सवरच्या त्यांच्या प्रेमाबद्दल काही न बोलणे उत्तम. कार्टून्स, अवेन्जर्स या िपट्र्सनी फ्लिप-फ्लॉपवर जागा पटकावली आहे. त्यामुळे हे फ्लिप-फ्लॉप आकर्षक दिसतात. मुलींसाठी खास स्टड्स, डायमंड लावलेले फ्लिप फ्लॉपसुद्धा बाजारात पाहायला मिळतात.

म्युल चप्पल

म्युल चप्पल्सचा समोरचा भाग झाकलेला असतो आणि मागच्या बाजूला दोन इंचाचे हील्स असतात. पावसाळ्यात लेदरच्या फॉर्मल शूजना बुरशी लागते म्हणून ते वापरता येत नाहीत. अशा वेळी ऑफिसवेअरमध्ये म्युल चप्पलचा पर्याय उपलब्ध आहे. मागच्या बाजूने चपलेप्रमाणे ओपन असल्याने या चपलांमध्ये पाणी गेलं तरी लगेच सुकतात आणि त्यांचा लुक फॉर्मल असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये वापरायला सोयीच्या असतात.

कुठे मिळतील?

ठाण्यातील राम मारुती रोड, जांभळी नाका, गावदेवी मार्केटमध्ये अशा प्रकारच्या चपला तुम्हाला सहज मिळतील. त्याचबरोबर कोरम मॉल, विविआना मॉल, हायपरसिटी मॉल अशा मॉलस्मधील काही चपलांच्या स्टोर्समध्येही चपला उपलब्ध आहेत. फ्लिप-फ्लॉप, सँडल चप्पल, वेजेस चप्पलची किंमत १५० रुपयांपासून सुरुवात होते. म्युल चप्पल, सॉक्स चप्पलच्या किमती ५०० रुपयांच्या घरात आहेत.