वॉडरोबमध्ये अनेक छोटय़ाछोटय़ा गोष्टी असतात. ज्या स्वस्तात स्ट्रीट मार्केटवरून घेतलेल्या असतात. वर्षांनुवर्षे एका कोपऱ्यात पडलेल्या असतात; पण अडचणीला मदतीस धावून येतात. अगदी दोन-तीन वर्षे जुना लूझ टी-शर्ट, योग्य फिट होणारी जीन्स, छोटंसं कानातलं या गोष्टीचं यात हक्काचं स्थानच. बरं यांची गंमत म्हणजे यांना लेटेस्ट ट्रेण्ड्स, स्टाइलचं वावडं नसतं. त्या ‘ऑलवेज इन ट्रेण्ड’ असतात. बॉलीवूडच्या एखाद्या एव्हरग्रीन नायिकेप्रमाणे. ‘खालीच बाजारात जायचं आहे’ ते ‘आय हॅव निथग टू वेअर’ सिंड्रोमपर्यंत प्रत्येक वेळी ते मदतीला येतात. कपाटातल्या चप्पलेचेसुद्धा असेच आहे. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, इतक्या वेगवेगळ्या रंगाढंगांत बाजारात उपलब्ध असलेली ही चप्पल वॉर्डरोबमध्ये खूप महत्त्वाची असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वर्षांपूर्वी पादत्राणे म्हणजे चप्पल हेच समीकरण होतं. अगदी ‘पादुका’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या रूपापासून ते आजच्या चप्पल किंवा स्लिपपर्यंत त्यांची रूपं बदलत गेली पण त्याचं महत्त्व तसूभरपण कमी झालं नाही. कोल्हापुरी चप्पल, जोधपुरी चप्पलसारखे यांच्यातील काही भिडू अगदी बाजारातून कधीच निवृत्त होतं नाहीत तर स्लीपर्स प्रत्येक सीझननुसार आपलं रूप बदलून येतात. उन्हाळ्यामध्ये पायाला घाम येतो म्हणून बंद शूज, हील्स यांना विश्रांती दिली जाते. पावसाळ्यात तर हील्सचा पर्याय बंदच होतो, पण कॅनव्हास शूज, लेदर शूजसुद्धा कपाटात जातात. त्यामुळे चप्पल्स माना वर काढू लागतात. हीच बाब लक्षात घेऊन सध्या बाजारात विविध स्टाइल्सच्या चप्पल्स दाखल झाल्या आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion of women footwear
First published on: 11-06-2016 at 01:47 IST