आईला साहित्यात कायमच वरचे स्थान असून तिच्यावरील कविता, चित्रपट, लेख सहज उपलब्ध होतात. परंतु कुटुंबासाठी झटणाऱ्या बाबाची मात्र साहित्यात म्हणावी तितकी दखल घेतली जात नाही. घराबाहेर राबणाऱ्या वडिलांचे कष्ट दिसत नसले तरी ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ऐकल्यावर आपलेही डोळे पाणावल्याशिवाय राहात नाहीत. नुकताच मदर्स डे साजरा करण्यात आला. त्यावेळी आपल्या आईसाठी आठवणीने काही ना काही भेटवस्तू देणाऱ्यांपैकी कितीजणांना जूनच्या तिसऱ्य़ा रविवारी ‘फादर्स डे’ असतो हे लक्षात आहे? एकीकडे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण असे म्हणत असताना या दिवसाच्या निमित्ताने आईला हजारो रुपयांची भेटवस्तू देणारे आपण वडिलांसाठी किती खर्च करु शकतो असे पाहिल्यास या दोन्हींमध्ये खूप तफावत असल्याचे आपल्याला दिसून येईल. फादर्स डेच्या निमित्ताने काही देशांत याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मदर्स डेला मुलांकडून केल्या जाणाऱ्या खर्चाच्या तुलनेत फादर्स डेला केला जाणारा खर्च निश्चितच कमी आहे असे दिसून आले आहे. मुलं मदर्स डेला आईसाठी भेटवस्तू घेतात पण फादर्स डेला वडिलांसाठी भेटवस्तू घेण्याचं प्रमाण हे कमी आहे. असंही सर्वेक्षणातून समोर आलं आहे. अर्थात आईचं प्रत्येकांच्या आयुष्यात असणारं स्थान हे खूप मोठं आहे, त्यामुळे वर्षांतून एक दिवस तिच्यासाठी थोडसं का होईना काहीतरी वेगळं करावं असं प्रत्येक मुलाला वाटतं आणि ते केलंही पाहिजे. पण अनेक पाश्चात्य देशात फादर्स डेनिमित्त केला जाणारा खर्च हा कमी असल्याचं ‘नॅशनल रिटेल फेडरेशने’ आपल्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा हा दिवस १८ जून रोजी साजरा केला जाणार आहे. इंग्लंड आणि अमेरिकेबरोबरच जगातील ७० हून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fathers day 2017 total spending on fathers day is less than mothers day says national retail federation
First published on: 18-06-2017 at 10:34 IST