Find Out How Much Gas Is Left In LPG Cylinder : एलपीजी सिलेंडर आपल्याला घरोघरी दिसते. या सिलेंडरमुळे जेवण बनविणे अधिक सोयीस्कर झाले, पण सिलेंडरमध्ये गरजेनुसार गॅस भरावा लागतो. अनेकदा अंदाज नसल्यामुळे सिलेंडरमधील गॅस संपतो आणि वेळेवर गॅस भरून आणण्यासाठी धावपळ करावी लागते. पण, तुम्ही सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा अंदाज आधीच घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आधीच कळणार आहे की गॅस संपणार आहे.
ओल्या टॉवेलचा करा उपयोग
- सिलेंडरमधील गॅस लेव्हल तपासण्यासाठी एक ओला टॉवेल घ्या आणि सिलेंडरच्या भोवती गुंडाळा. यामुळे सिलेंडरची टाकी टॉवेलमुळे ओली झाल्यानंतर टॉवेल बाजूला काढा आणि चेक करा की सिलेंडरचा कोणता भाग लवकर वाळत आहे आणि कोणता भाग जास्त वेळ ओला आहे?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- गॅस लेव्हल तपासण्यासाठी सिलेंडरचा ओला आणि कोरडा भाग नीट तपासा. जो भाग ओला आहे त्या भागात गॅस आहे असे समजावे, तर जो भाग कोरडा आहे त्या भागातला गॅस संपला आहे असे समजावे.
- सिलेंडरमध्ये एलपीजी (LPG) असते. या गॅसमध्ये काही प्रमाणात लिक्विडसुद्धा असते. अशात सिलेंडरच्या जितक्या भागात गॅस असेल, तितका भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि लवकर वाळत नाही; पण ज्या भागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)