मोबाईलच्या कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु असून त्यातील फीचर्सवरुन विशिष्ट कंपनीच्या फोनवर ग्राहकांच्या उड्या पडत आहेत. फोनचा वापर फक्त संपर्क साधणं एवढाचा राहिला नसून इतर गोष्टींसाठीही फोनचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतोय. त्यातूनही सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी उत्तम कॅमेरा असलेल्या फोनलाही विशेष पसंती ग्राहकांची मिळताना दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकिया ८ या नव्याने बाजारात दाखल झालेल्या फोनमध्ये दोन्ही बाजूने फोटो काढता येणार आहे तसेच व्हिडिओ शूटींग करता येणार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार फोनमधील ऑडिओ आणि व्हिडिओची गुणवत्ता वाढविण्यात आली आहे. यामध्ये कॅमेरा मेकर ZEISS ची लेन्स वापरण्यात आली आहे. यामुळे तुम्ही एकावेळी दोन्ही बाजूचा कॅमेरा वापरुन व्हिडिओ काढू शकणार आहात म्हणजे एकाचवेळी फ्रंट आणि बॅक कॅमेरानं शूटींग करता येणार आहे.

या नव्या फिचरमुळे नोकिया बाजारातील इतर कंपन्यांना चांगलीच टक्कर देणार आहेत. यामध्ये सॅमसंगला जास्त टक्कर बसणार आहे. आपल्याला एखादी मुलाखत घ्यायची असल्यास या फीचरचा विशेष उपयोग होणार आहे. कारण यामध्ये दोन्ही व्यक्ती एकावेळी दिसू शकणार आहेत. त्यामुळे कॅमेरामन आणि कॅमेरा नसेल तरीही तुमचे काम अडणार नाही आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. नोकिया ८ कॅमेराचा दोन्ही बाजूचा कॅमेरा १३ मेगापिक्सेल असल्याने या व्हिडिओची क्षमताही चांगली असेल. क्वॉल्कॉमचा लेटेस्ट प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८३५ देण्यात आला आबे. ४ जीबी रॅमबरोबरच ६४ जीबीची इंटरनल मेमरी यामध्ये आहे. ही मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढविण्यात येऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First impressions nokia 8 dual camera use same time new features
First published on: 17-08-2017 at 14:33 IST