ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Big Saving Days sale ला सुरूवात झाली आहे. 10 ऑगस्टपर्यंत हा सेल सुरू असेल. पाच दिवसांच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर शानदार ऑफर्स व डील्स मिळतील. याशिवाय, फ्लिपकार्टने या सेलसाठी Citibank आणि ICICI Bank यांच्यासोबतही भागीदारी केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

iPhone XR वर डिस्काउंट –
या सेलमध्ये iPhone XR, Oppo Reno 2F, iPhone SE आणि Redmi K20 Pro यांसारख्या फोनवर डिस्काउंट मिळेल. याशिवाय Motorola Razr foldable फोनवरही 20,000 रुपयांची सवलत आहे. iPhone XR हा फोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आठ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह 44,999 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. या फोनच्या खरेदीवर कंपनीकडून 13 हजार 450 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर व काही बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरही डिस्काउंटची ऑफर असेल. तर, 23 हजार 490 रुपयांचा Oppo Reno 2F स्मार्टफोन सेलमध्ये 17,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जवळपास 5,500 रुपये डिस्काउंट ग्राहकांना मिळेल.

Redmi K20 Pro आणि iPhone SE वरही ऑफर – 
याशिवाय, 42,500 रुपयांचा iPhone SE 2020 स्मार्टफोन 36 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. या फोनच्या खरेदीवरही 13 हजार 450 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर आहे. याशिवाय, Redmi K20 Pro या स्मार्टफोनच्या 6 जीबी + 128 जीबी व्हेरिअंटची किंमत सेलमध्ये 26,999 रुपयांऐवजी 22,999 रुपये आहे. म्हणजेच फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेलमध्ये रेडमी के20 प्रो स्मार्टफोनवर 4,000 रुपयांची बचत होईल. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 1 लाख 24 हजार 999 रुपये किंमत असलेल्या Motorola Razr (2019) स्मार्टफोनवरही ग्राहकांची 20,000 रुपये बचत होऊ शकते. याव्यतिरिक्त Oppo Reno 10X Zoom, iPhone 7 Plus, आणि iQOO 3 या स्मार्टफोनवरही सेलमध्ये आकर्षक डिस्काउंट आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart big saving days sale 2020 begins check offers and best deals sas
First published on: 06-08-2020 at 09:57 IST