थंडीला आता सुरुवात होत आहे. थंडीत त्वचा कोरडी पडणे, काळी पडणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. मॉइश्चरायझ करणे, योग्य आहाराचे सेवन करणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. या थंडीत त्वचेला तजेला देण्यासाठी काही टिप्स-
त्वचेची निगा राखण्यासाठी दररोज काही प्राथमिक गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. त्यात मॉइश्चरायझरचा सामावेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि ती ताजीतवानीही होते. नारळाचा समावेश असलेले मॉइश्चरायझर त्वचेसाठी अधिक चांगले असते. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या मृदू आणि तरुण बनते. हा तजेला दिवसभर टिकतो.
त्वचा चमकदार दिसण्यासाठी आठवडय़ातून दोन वेळा एक्झफोलिएटिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत आणि निस्तेज त्वचा काढून टाकली जाते. यासाठी घरगुती उपायही करतात. भरडलेले ओट्स, मध, साखरेचे दाणे एकत्र करून ते मिश्रण पाच ते दहा मिनिटे चेह-यावर वर्तुळाकारात चोळावे.
हात आणि पावलांची विशेष काळजी घ्यावी. कारण त्यांची त्वचा लगेच शुष्क आणि रुक्ष बनते. अशी त्वचा मऊसूत राहण्यासाठी त्यावर दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर लावावे.
त्वचेला मॉइश्चराइझ करणारा फेस पॅक घरच्या घरी बनवा आणि त्वचा अधिक मऊ बनवा. पपईचा गर आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बनवा आणि त्याने ओल्या चेह-याला १५ मिनिटे मसाज करावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For glowing skin in winter season
First published on: 08-11-2013 at 02:37 IST