गणेशोत्सव म्हटला की पारंपरिक वेशभूषा आपण करतोच, मात्र या पारंपरिक वेशभूषेला मर्यादा येतात. दैनंदिन कामकाजात कार्यालयात किंवा महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा फार क्वचित केली जाते. मग सणाला अनुरूप आणि झटपट करता येईल अशी फॅशन करायची ती काय? असा प्रश्न पडतो. मात्र अलीकडे तरुणांनी गणेशोत्सवात अनोखी फॅशन अमलात आणली आहे. सध्या गणपतीची चित्रे असलेली टीशर्ट्स परिधान करण्याची नवी फॅशन बाजारात आली आहे. गणपतीची चित्रे असलेली टीशर्ट्स गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच दुकानांमध्ये विक्रीसाठी पाहायला मिळाली. गडद रंगाची ही टीशर्ट्स आणि त्यावर गणपतीची आकर्षक कलाकृती या फॅशनला तरुणांकडून जास्त पसंती मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश मुद्रा असलेले टीशर्ट
प्लेन रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर साकारलेली गणेशाची मुद्रा. या टीशर्टमुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळा सणाचा पेहराव करण्यासाठी तरुण मंडळी उत्सुक आहेत. या टीशर्टवर गणेशाचे वेगवेगळे भाव दर्शवणारी मुद्रा चित्र स्वरूपात पाहायला मिळते.

अक्षरगणेश टीशर्ट
नावाप्रमाणे गणेश कलाकृतीची छाप टीशर्टवर मिरवायला तरुणांच्या आवडीचे बनले आहे. आपल्या नावाचे अक्षरगणेश टीशर्टवर खास डिजिटल प्रिंट करून घेतले जातात.
घोषवाक्य टीशर्ट
गणपती बाप्पा मोरया, विघ्नविनायक, मोरया रे बाप्पा मोरया, वक्रतुंड महाकाय, माझा बाप्पा, मंगलमूर्ती मोरया, गणा धाव रे मला पाव रे, ओम गं गणपतये नम: अशी अनेक गणपतीचे जागर करणारी घोषवाक्ये, काही गणपतीचे श्लोक, स्तोत्र टीशर्टवर पाहायला मिळतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati on ti shirt
First published on: 26-09-2015 at 00:22 IST