हिंदू धर्मात प्रत्येक तिथीला महत्व आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणपतीची आराधना केली जाते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. मार्गशीष महिना संपला असून आता पौष महिना सुरु झाला आहे. पौष महिन्यानंतरी शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ६ जानेवारीला आहे. या दिवशी गणपतीचा पूजा विधी केला जातो. या दिवशी उपासना केल्यानंतर जीवनातील दु:ख आणि संकटं सौम्य होतात, अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात कोणत्याही कार्याची पूजा करण्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंचांगानुसार शुक्ल पक्षातील चतुर्थी ५ जानेवारीला दुपारी २ वाजून ३४ मिनिटांनी सुरु होते आणि ६ जानेवारीला दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी संपते. ६ जानेवारीला ११ वाजून १५ मिनिटांपासून १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत गणपतीची पूजा विधी केला जाऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati vinayak chaturthi on 6 january 2022 pooja vidhi and muhurt rmt
First published on: 03-01-2022 at 10:40 IST