How to Clean Gas Stove Lighter: प्रत्येक घरामध्ये गॅस शेगडी असतेच. शेगडीमुळे महिलांची कामे खूपच सोपी झाली आहेत. गॅस शेगडीशिवाय आपण स्वयंपाकाची कल्पनाही करू शकत नाही. गॅस पेटवण्यासाठी घराघरात लायटर वापर केला जातो. पण तुमच्या रोजच्या वापरामुळे लायटरकवर धूर साचू लागते. त्यामुळे ते खूप कळकट-अस्वच्छ दिसू लागतात. लायटर स्वच्छ करताना त्यात पाणी शिरते त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे लायटर नेमका स्वच्छ कसा करावा, असा प्रश्न महिलांनो पडतो, पण आता मात्र काळजी करु नका, आज आम्ही तुम्हाला तुमचे लायटर झटपट कसे स्वच्छ करायचे, याच बद्दलच्या काही सोप्या खास टिप्स सांगणार आहोत.
वास्तविक, बर्याच काळ जर तुम्ही लायटरची साफसफाई न केल्यामुळे, लायटरच्या अंतर्गत भागात घाण जमा होते. पाणी लागल्याने लायटर खराब होतो. यामुळे गॅस स्टोव्ह जळत नाही. म्हणून गॅस शेगडीचा लायटर स्वच्छ करण्यासाठी खाली सोप्या टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात.
गॅस लायटर ‘अशा’ पद्धतीने करा स्वच्छ
१. बेकिंग सोडा
लायटर स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि लिंबूचा वापरू शकता. यासाठी, १ चमचे बेकिंग सोडामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालून जाड पेस्ट बनवा. ही तयार झालेली पेस्ट लायटरवर लावा आणि २० मिनिटांसाठी तसेच ठेवा. २० मिनिटे पूर्ण झाल्यानंतर कोरड्या कापडाने पेस्ट पुसून टाका. या पेस्टबरोबर लायटरवरील चिकट डागही निघून जातील.
(हे ही वाचा : रोज दुधाची पिशवी फोडताना तुम्हीही ‘अशी’ चूक करता का? ‘हा’ VIDEO एकदा पाहाच! )
२. तांदळाचे पाणी
लायटर साफ करण्यासाठी, एका वाटीत १ चमचे तांदळाचे पाणी आणि त्यात इनो मिक्स करुन पेस्ट तयार करा आणि हे तयार मिश्रण लायटरच्या बाहेरील भागावर लावा. नंतर कोरड्या कापडाने पेस्ट पुसून टाका. त्यामुळे हे चिकट डाग त्वरित साफ होऊ शकतात.
३. टूथपेस्ट
लायटरवरील चिकट डाग काढण्यासाठी तुम्ही टूथपेस्टची मदत घेऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी टूथपेस्ट लायटरवर लावा आणि सकाळी ब्रशने घासून घ्या आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून टाका आणि चिकट काळपट पडलेला लायटर यामुळे स्वच्छ दिसेल. सोबतच चमकूही लागेल.
(वरिल टिप्स या प्राप्त माहितीवर आधारित आहेत.)