व्हॅलेंटाइन वीकमधील पाचवा दिवस म्हणजेच ११ फेब्रुवारी प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी आपल्या जोडीदाराला वचने देतात. साहजिकच जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी काहीही करायला तयार असता. आपल्या जीवनात वचनाला किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. प्रेमातील वचने ही दोन मनांना एकत्र ठेवणारी एकमेव तार असते. या प्रॉमिस डेला काही खास वचन देऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचे नाते आणखी घट्ट करू शकता.

एकमेकांसाठी वेळ काढणे

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात लोक इतके व्यस्त असतात की त्यांना आपल्या जोडीदारासाठी वेळ काढणे देखील कठीण असते. अशातच, या प्रॉमिसडेला तुमच्या जोडीदाराला वचन द्या की तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनातून काही वेळ त्याच्यासाठी नक्कीच काढाल. असे केल्याने तुम्हाला एकमेकांना समजून घेण्यास, एकमेकांच्या समस्या शेअर करण्यास आणि त्यावर उपाय शोधण्यात मदत होईल.

csk vs pbks selfish ms dhoni sends back daryl mitchell slammed for denying single ipl 2024
“धोनी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, स्वार्थी…”, PBKS vs CSK सामन्यातील धोनीच्या त्या कृतीवर भडकले चाहते, पाहा VIDEO
Health Benefits of Castor Oil
रोज एक चमचा एरंडेल तेलाच्या सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा

‘या’ ४ राशींसाठी हा व्हॅलेंटाइन वीक ठरणार अविस्मरणीय; होईल प्रेमाचा वर्षाव

नात्यामध्ये सदैव प्रामाणिक राहण्याचे वचन

नाते कितीही चांगले असले तरीही जर त्यात प्रामाणिकपणा नसेल तर ते जास्त काळ टिकत नाही. म्हणूनच तुम्ही तुमचे नाते अधिक चांगले आणि सुखी बनवण्याकरिता या प्रॉमिस डेच्या दिवशी तुमच्या जोडीदाराला प्रामाणिक नाते ठेवण्याचे वचन द्या.

सर्व स्वप्न एकत्र पूर्ण करण्याचे वचन

अनेकदा एखाद्या नात्यात आल्यानंतर व्यक्ती आपल्या जोडीदाराची स्वप्न पूर्ण करता करता स्वतःची स्वप्ने विसरते. जर एखाद्या नात्यात दोन्ही व्यक्ती सामान आहेत तर स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी एकाचीच का असावी? या प्रॉमिस डेला तुम्ही आपल्या जोडीदाराला हे वाचन द्या की त्यांनी जी स्वप्न पाहिली आहेत ती दोघ मिळून पूर्ण करतील आणि एकमेकांना साथ देतील.

ज्या घरात घेतली जाते ‘या’ ५ गोष्टींची विशेष काळजी, त्याच घरात देवी लक्ष्मी करते वास

भावनिक आधार देण्याचे वचन

आजच्या काळात व्यक्तीला अनेकदा एकटेपणा जाणवतो. अशात लोकांना भावनिक आधाराची नितांत गरज असते. परंतु बहुतांश जोडीदार ही गोष्ट विसरतात. त्यामुळे या प्रॉमिस डेला आपल्या जोडीदाराला भावनिक आधार देण्याचे वचन द्या. तुम्ही त्यांच्या भावनांचा आदर कराल आणि त्यांच्या भावना कधीही दुखावणार नाहीत, असे वचन आपल्या जोडीदाराला द्या.

प्रत्येक काम एकत्र मिळून करण्याचे वचन

सध्याच्या काळात घरातील स्त्री-पुरुष दोघेही नोकरी करतात. परंतु घरातील काम फक्त स्त्रियांनाच करावी लागतात. या प्रॉमिस डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला हे वचन द्या की तुमच्या जोडीदाराला वचन द्या की पुरुष किंवा स्त्री या धर्तीवर कामाची विभागणी करण्याऐवजी तुम्ही सर्व काम एकत्र कराल.