पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक म्हणजे केरळ. उत्तर भारतासोबतच दक्षिणेकडील केरळ या राज्याकडेही पर्यटकांचा ओढा असतो. ‘देवभूमी’ केरळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यात पर्यटकांचं विशेष लक्ष वेधणारं एक ठिकाण म्हणजे मुन्नार. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या या भागात येत्या काही दिवसांमध्ये निळसर आणि जांभळ्या रंगांची उधळण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गाची ही उधळण पाहता खऱ्या अर्थाने केरळचं कास पठार फुलणार आहे, असंच म्हणावं लागेल. कारण, तब्बल बारा वर्षांच्या कालावधीनंतर नीलाकुरिंजी या फुलांना मुन्नारच्या टेकड्यांवर बहर येणार आहे. जुलैमहिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत इथे ही निळसर रंगाची नैसर्गिक चादरच जणून पर्यटकांना पाहण्याची संधी मिळणार आहे.
अतिशय दुर्मिळ प्रजातीच्या या फुलझाडांच्या संवर्धनासाठी ‘सेव्ह कुरिंजी’ हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, काही स्वसंस्वेवी संस्थांनीसुद्धा या उपक्रमात हातभार लावला आहे.

Munnar

Condé Nast Travellerने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार देशविदेशातून लाखे पर्यटक निसर्गाचे हे रंग पाहण्यासाठी एराविंकुलम नॅशनल पार्क येथे येतील असा अंदाज पार्कशी संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तवल्याचं कळत आहे.

पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडण्यासोबतच ही फुलझाडं, फुलपाखरं आणि मधमाशांसाठीही तिततीच उपयुक्त असल्याचं कळत आहे. केरळ सरकारकडूनही या सुरेख आणि तितक्याच दुर्मिळ प्रजातीच्या फुलझाडांच्या संवर्धनासाठी काही पावलं उचलली जात असल्याचं कळत आहे.

neelakurinji flower

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

कधी पाहता येईल नीलाकुरिंजीचा हा बहर?
जुलै महिन्याअखेरीपासून, ऑक्टोबर महिन्यापर्यंत
कुठे पाहता येणार ही फुलं?
कोचीपासून पाच तासांच्या अंतरावर असलेल्या कोविलुर, राजमाला, एराविकुलम नॅशनल पार्क येथे सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत पर्यटकांना निसर्गाची ही किमया पाहता येईल. या ठिकाणी भारतीय पर्यटकांकडून १२० रुपये इतकं प्रवेश शुल्क आकारलं जाईल.
जवळचं रेल्वेस्थानक- अंगामलय
जवळचं विमानतळ- कोची

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Go travel and visit rare neelakurinji flower will turn kerala munnar purple this month
First published on: 17-07-2018 at 14:29 IST