व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कंपनीने नेहमीप्रमाणे अॅप अपग्रेड केलं असून यामध्ये नव्या ६१ वॉलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे युजर्सना चॅटिंग करताना वेगळाच अनुभव मिळू शकतो. व्हॉट्सअॅपनं सध्या आपल्या बीटा युजर्ससाठी हे वॉलपेपर आणलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने याबाबत माहिती देताना म्हटलं की, “व्हॉट्सअॅपने आपल्या अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी अॅडव्हान्स्ड वॉलपेपर नावाचं फीचर लॉन्च केलं आहे. युजर्स आपल्याला आवडेल अशा पद्धतीनं चॅटिंगच्या बॅकग्राउंडचं वॉलपेपर बदलू शकतात. आता यासाठी त्यांना ६१ नव्या वॉलपेपर्सचे पर्याय मिळू शकतील.

ट्वीटसोबत व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने वॉलपेपर्सच्या डिझाईनची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. याद्वारे नवे वॉलपेपर कसे दिसतात हे पाहता येईल. यातील खास बाब ही आहे की युजर्स वॉलपेपरच्या ओपेसीटीमध्ये देखील बदल करु शकतात.

२९ नवे डार्क वॉलपेपर्स

युजर्स ३२ नवे ब्राइट वॉलपेपर्स, २९ नवे डार्क वॉलपेपर्स, कस्टम वॉलपेपर आणि सॉलिड कलरमध्ये आपल्या हिशोबानं निवडू शकतात. जर आपण जुना वॉल पेपर निवडला तर आपण व्हॉट्सअॅप अर्काईव्ह हा पर्याय निवडू शकता.

अनेक पर्याय मिळणार

जर आपण सॉलिड रंगांना नव्या वॉलपेपरप्रमाणे सेट करु इच्छित असाल तर आपण याला व्हॉट्सअॅप डुडलवर घेऊ शकता. व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने सांगितलंय की, सध्या याला बीटा युजर्ससाठी लॉन्च करण्यात आलं आहे. लवकरच याला स्टेबल व्हर्जनमध्ये सर्वांसाठी लॉन्च करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good news for whatsapp users 61 new wallpapers added to the app aau
First published on: 15-11-2020 at 16:10 IST