माहितीसाठी मित्र बनलेलेले सर्चइंजिन गुगल आता आरोग्यमित्रही होणार आहे. गुगलच्या संशोधकांनी कर्करोग व हृदयरोगाचे निदान करण्यासाठी नॅनोकणांना गोळीबद्ध करून नवीन साधन तयार केले आहे, हे संशोधन करणाऱ्यात एका भारतीयाचाही समावेश आहे. इंटरनेट कंपनी असलेल्या गुगल एक्स ही कंपनी हे संशोधन करीत असून त्यांनी रोगनिदानासाठी नॅनोकणांचा वापर केला आहे. नॅनोकण असलेली गोळी घेतल्यानंतर रुग्णाच्या रक्तात ते कण जातात व मनगटाला लावलेल्या सेन्सरच्या मदतीने त्यांची स्थिती बघता येते. त्यामुळे रक्तातील कर्करोगाचे अवशेष समजतात व त्यामुळे शारीरिक लक्षणे दिसण्याआधीच कर्करोगाचे निदान होते. गुगलच्या या संशोधन प्रकल्पात विक्रम बजाज व संजीव मारियाथछासन या भारतीयांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संशोधन
रेणवीय जीवशास्त्रज्ञ डॉ. अँड्रय़ू कोनराड यांनी सांगितले की, औषधात आम्ही बदल करीत असून रोग होण्याच्या आधीच त्याचे निदान करण्याचा हेतू आहे. नॅनोकणांमुळे शरीराची रेणवीय व पेशी पातळीवरची तपासणी करता येते. नॅनोकण हे विविध स्थितीस जुळणाऱ्या मार्कर्ससह पाठवले जातात. ते कर्करोगाच्या पेशी किंवा कर्करोगग्रस्त डीएनएच्या तुकडय़ाला चिकटतील अशी रचना करता येते. हृदयविकारात धमन्यांमध्ये मेदाची पुटे चढतात तीही शोधता येतात. रक्तप्रवाह थांबल्याने पक्षाघाताचा झटका येतो त्याचेही निदान करता येते. रक्तात पोटॅशियम जास्त असेल तर मूत्रपिंडाचे विकार होतात. पोटॅशियम नॅनोकणांच्या छिद्रातून गेले तर रंग बदलला जाईल असे नॅनोकणही यात तयार करता येतात, असे बीबीसी न्यूजने म्हटले आहे.जेव्हा आपण हे नॅनोकण एका ठिकाणी गोळा केले जातात तेव्हा ते मनगटाजवळ येतात तेव्हा त्यांना आपण तुम्ही शरीरात काय पाहिलेत हे संवेदकाच्या मदतीने विचारू शकतो असे कोनार्ड यांनी सांगितले. रेडिओ लहरी किंवा प्रकाश यांच्या मदतीने दिवसातून एकदा-दोनदा नॅनोकणांची मापने घेऊ शकेल असा मनगटी पट्टा गुगल तयार करीत आहे.

संशोधक
नॅनोतंत्रज्ञांना प्रकल्पासाठी गुगलने १०० तज्ञ घेतले असून ते खगोलभौतिकी, प्रतिकारशक्ती, जीवशास्त्र, कर्करोगशास्त्र, हृदयरोगशास्त्र, रसायनशास्त्र या विभागातील आहेत. गुगल एक्स जीवशास्त्र पथक ज्या प्रकल्पावर काम करीत आहे त्यात विक्रम बजाज यांचाही समावेश आहे. बजाज हे रेणवीय प्रतिमाचित्रण, चुंबकीय सस्पंदन प्रतिमाचित्रण यांच्या मदतीने रोगनिदान करण्यातील तज्ज्ञ आहेत. संजीव मारियाथासन हे प्रतिकारशक्ती विषयातील तज्ज्ञ आहेत. कर्करोगाशी संबंधित रक्तविकार, संसर्गाचे आजार यात त्यांचे संशोधन आहे.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google is developing a cancer and heart attack detecting pill
First published on: 30-10-2014 at 01:19 IST