अस्थिमज्जेशी संबंधित मल्टिपल मायलोमा व अमायलोयडोसिस या रोगांमध्ये ग्रीन टीमधील संयुग गुणकारी ठरते. असे दिसून आले आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधनानुसार एपिगॅलोकॅटेसीन ३ गॅलेट हे संयुग पॉलिफेनॉल गटातील असून ती ग्रीन टीच्या पानांमध्ये आढळून येते. ते मल्टिपल मायलोमा व अमायलोयडोसिस या रोगांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपकारक ठरते. लाइट चेन अमायलॉइडोसिस या रोगात शरीराच्या एका भागातील प्रतिपिंड विविध अवयवांमध्ये पसरतात, त्यात हृदय व मूत्रपिंडाचा समावेश असतो. यात लाइट चेन अमायलॉइडोसिसचा उलगडा आवश्यक होता व त्यावर ग्रीन टीमधील संयुग कसे काम करते हे समजते. असे वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक जॅन बिशके यांनी म्हटले आहे. लाइट चेन अमायलॉइडोसिस अस्थिमज्जा रोगाच्या रुग्णांमधून वेगळे काढले गेले. व नंतर त्यावर ग्रीन टीमधील संयुगाचे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. एपिगॅलोकॅटेसीन ३ गॅलेट या संयुगाचा परिणाम पार्किन्सन व अल्झायमर या रोगांमध्ये तपासण्यात आला. त्यात दोन्ही रोगांत साचत जाणाऱ्या घातक प्रथिनांना हे संयुग अटकाव करते. असे दिसून आले. लाइट चेन अमायलॉइडोसिसची पुनरावृत्ती व त्यांचे साचत जाणे यात थांबवले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green tea is helpful for bone marrow
First published on: 15-02-2017 at 02:13 IST