मराठी नववर्षाची चाहूल लागताच गुढी उभारण्याच्या तयारीसोबतच वेध लागतात ते म्हणजे शोभायात्रांचे. विविध ठिकाणी पाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभायात्रांचे आयोजन केले जाते. तरुणाईचा उत्साह, त्यालाच मोठ्या मंडळींची साथ आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन इतरांना घडवण्यासाठी सुरु असलेली लगबग सारं काही या शोभायात्रांच्या माहोलात पाहायला मिळतं. भरजरी नऊवारी साडीपासून ते अगदी फेट्याच्या तुऱ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत मग सो कॉल्ड परफेक्शन शोधणाऱ्यांची झलकही शोभायात्रांच्या तयारीदरम्यान पाहायला मिळते. सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या या शोभायात्रांचा एक महत्त्वाचा भाग किंवा घटक म्हणजे ढोल-ताशा पथकं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ढोलाचा ठोका आणि ताशाची तर्री पडली की अनेकांचेच पाय ठेका धरु लागतात आणि मग वातावरणात आवाज घुमतो तो म्हणजे लयबद्ध आणि शिस्तबद्ध वादनाचा. गेल्या काही वर्षांमध्ये ढोल-ताशा पथकांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. ‘गिरगाव ढोल पथक’ ‘मोरया’, ‘वंदन’, ‘गजर’, ‘नादब्रम्ह’, ‘कलेश्वरनाथ’, ‘शिवगर्जना’, ‘रमणबाग’ अशा विविध पथकांतून हजारो वादक सध्या गुढी पाडव्याच्या तयारीमध्ये चांगलीच मेहनत घेताना दिसताहेत.

मराठीतील सर्व गुढी पाडवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudhi padwa 2017 dhol tasha pathak
First published on: 26-03-2017 at 10:00 IST