Home Remedies for New Hair Growth: आजकाल प्रत्येक जण केस तुटणे, केस गळणे, पातळ होणे व केस निर्जीव होण्यामुळे त्रस्त आहेत. केवळ महिलाच नाही, तर पुरुषांनाही केस गळण्याच्या समस्येचा खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत, केसगळती थांबवून नवीन केस उगवण्यासाठी लोक विविध उपाय करतात. त्यामध्ये कित्येक जण बाजारातील महागडे रसायनयुक्त प्रॉडक्ट्स वापरतात. अशा परिस्थितीत तुम्ही काही आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांचा अवलंब करून केस गळण्याची समस्या कमी करू शकता.
केसांसाठी आवळा
आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते. त्यामुळे केसांना अनेक प्रकारे फायदा होतो. आवळा केसांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. त्यात फायटोन्यूट्रिएंट्स, तसेच खनिजे असतात. त्यामुळे केसांच्या टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते. याद्वारे सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे टाळूपर्यंत म्हणजेच केसांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात.
आवळ्याचे सेवन केल्याने केसांना होतात हे फायदे
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए व बी असते. त्याशिवाय त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह व कॅल्शियमदेखील असते. एवढेच नाही, तर आवळ्यामध्ये भरपर फायबर आणि डाययुरेटिक ॲसिड असते, जे केसांसाठी फायदेशीर असते.
आवळ्यामुळे टाळूचे कंडिशनिंग होते. केसांचा आकार वाढतो. नवीन निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. केसातील कोंडा कमी करण्यास मदत मिळते.
केसगळती थांबवण्यासाठी आणि नवीन केस वाढवण्यासाठी आवळा केसांना कसा लावावा?
तुम्ही कोरड्या आवळ्याची पेस्ट बनवू शकता आणि ती थेट केसांना लावू शकता. त्याशिवाय तुम्ही चहाच्या पानांच्या पाण्यात आवळा पावडर मिसळून केसांना लावू शकता. तुम्ही केसांसाठी अंड्याचाही उपाय करू शकता. तर, तुम्ही त्यात आवळा पावडर मिसळून केसांना लावू शकता.