साहित्य : साहित्य : तीळ – एक वाटी, भाजलेले शेंगदाणे – एक वाटी, गूळ – एक वाटी वेलची पावडर – दीड चमचा, गव्हाचे पीठ – दीड वाटी, मैदा – अर्धी वाटी, तेलाचे मोहन – पाव वाटी, मीठ – चवीनुसार, साजूक तूप – दोन चमचे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृती : तीळ भाजून घ्या. शेंगदाणे, तीळ, गूळ सर्व एकत्र करून वाटून घ्या. नंतर त्यात वेलची पावडर, तूप घालून परत एकत्र वाटा. सारण तयार होईल.गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्या.पिठाची पारी करून त्यात सारण भरा. तांदळाच्या पिठावर पोळी लाटून तेल सोडून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.या पोळ्या संक्रांतीला केल्या जातात.या पोळ्या चांगल्या टिकतात, त्यामुळे प्रवासात घेऊन जाता येतात. संक्रांतीला तीळ, गुळाचे पदार्थ खाल्ले जातात. त्यात ही पोळी महत्त्वाची आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy makar sankranti 2019 recipe tilgulachi telchi
First published on: 14-01-2019 at 07:03 IST